नंदुरबार l प्रतिनिधी
पन्नास हजार वर्षानंतर पहिल्यांदाच पृथ्वीच्या दिशेने धूमकेतू येत आहे.हा धूमकेतू पृथ्वीच्या जवळून जाणार आहे. वैज्ञानिकांमध्ये देखील याबाबत मोठी उत्सुकता आहे.
या धूमकेतूचे नाव C/2022 E3(ZTF) असे आहे. यालाच ग्रीन कॉमेंट असेही म्हणतात. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हा धूमकेतू अवकाशात दिसणार आहे. तुमच्या परिसरातील आकाश निरभ्र असेल तर तुम्ही हे दृश्य दुर्बिणी शिवाय पाहू शकाल. कॅलिफोर्नियाच्या झाविकी ट्रांझियंट फॅसिलिटीच्या शास्त्रज्ञांनी मार्च 2022 मध्ये हा धूमकेतू शोधला तेव्हापासून ते त्याचा मागवा घेत आहेत.
12 जानेवारी 2023 रोजी C/2022 E3(ZTF) या धूमकेतूचे अंतर सुमारे 160 दशलक्ष किलोमीटर असेल. तर 2 फेब्रुवारी 2023 रोजी त्याचे अंतर पृथ्वीपासून सुमारे 42 दशलक्ष किलोमीटर असेल. म्हणजेच तो यावेळी पृथ्वीच्या सर्वात जवळ असेल. यापुढे तो कधी दिसेल हे भाकीत करणे कठीण आहे.
सध्या हा धूमकेतू सूर्यमालेच्या आतील भागातून जात आहे 12 जानेवारीला तो सूर्याच्या सर्वात जवळ पोहोचला त्यानंतर एक किंवा दोन फेब्रुवारीला तो पृथ्वीच्या सर्वात जवळून जाईल. यावेळी धूमकेतूपासून पृथ्वीला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.
हा धूमकेतू उत्तर गोलार्धात म्हणजे आपल्याकडे सप्तर्षी नक्षत्राच्या व ध्रुवाच्या जवळ दिसेल व तो सकाळी सूर्योदयापूर्वी तीन तास दिसू शकेल . तो जेव्हा सूर्याजवळ असेल तेव्हा त्यातील बर्फ व धूळ वितळून गॅस बनते व एक झुकेदार शेपटी तयार होते .पण जसजसा तो सूर्यापासून लांब जातो तसतसा त्याची शेपटी कमी होऊ लागते व तो अतिशय तेजस्वी दिसतो हा धूमकेतू हिरव्या रंगाचा दिसेल.
पूर्वीच्या काळी धूमकेतूला शेंडे नक्षत्र असेही म्हटले जात असे.
प्राचीन काळी ख्रिस्त पूर्व कालगणना सुरू होण्यापूर्वी 350 वर्ष म्हणजेच इसवीसन पूर्व 350 या सुमारास ग्रीक तत्ववेत्ता एरिस्टॉटल याच्या meteorology नावाच्या ग्रंथात धूमकेतूचा प्रथम उल्लेख सापडतो. त्याने पृथ्वीच्या वातावरणात दूरवर घडणारे निसर्गाचे निष्वास असे धूमकेतूचे वर्णन केले आहे त्यानंतर अनेक शास्त्रज्ञांनी आपापली मते मांडली.
धूमकेतू म्हणजे काय ?
धूमकेतूचे तीन भाग पडतात गाभा, शिखा व शेपटी वायु आणि धूळ यांनी बनलेला असतो. प्रदक्षिणा मार्गावरून प्रवास करीत असताना सूर्याच्या दिशेने धूमकेतू जसा जसा जवळ येऊ लागतो तसे तसे सूर्याचे किरण त्यावर पडून वायु आणि धुलीकण तप्त होतात माने प्रसरण पावतात. एक प्रकारचा वायू आणि धुली कणांचा ढग तयार होतो यालाच धूमकेतचा कोमा असे म्हणतात. गाभा व गाभ्याभोवती तयार झालेला हा कोमा मिळून धूमकेतूचे शीर तयार होते.
धूमकेतूच्या आकारमान
शिराच्या मध्यभागी असलेल्या गाभ्याचा व्यास ५ ते १० हजार किलोमीटर असून त्याचे वस्तुमान १०१७ग्रॅम आहे म्हणजेच पृथ्वीपेक्षा खूपच कमी आहे. आपण धूमकेतू पाहतो म्हणजे प्रसरण पावलेला कोमा पाहतो. कधी कधी हा कोमा हजारो व्यासाचा आकारमानाचा असतो. त्यातील धुली कणांवर व इतर भागावर प्रकाश पडून तेथील प्रकाश किरण परावर्तित होतात व तो भाग चमकू लागतो.
आपल्याला तेजस्वी दिसू लागतो धूमकेतू स्वयंप्रकाशी नाही.
धूमकेतूची शेपटी
धूमकेतूच्या शिराचा जो भाग प्रसरण पावतो त्यातून वाळूयुक्त धुळीच्या कणांचे लोट बाहेर फेकले जातात.
सूर्यापासून तर नेहमीच वायू व इतर द्रव्य बाहेर फेकण्याची क्रिया सतत चालू असते त्यामुळे एक प्रकारचा उत्सर्जन दाब निर्माण होतो हा दाब लाटेप्रमाणे सर्व बाजूने पसरतो आणि धूमकेतूपासून हलके होऊन बाहेर पडणाऱ्या वायू व धुलीकनांना बाहेर ढकलत असतो.
ढकलल्या गेलेल्या दृश्यात लांबलचक शेपटीचा आकार तयार होतो सूर्याच्या प्रकाश किरणांमुळे ही शेपटी चमकू लागते व आपल्याला तेजस्वी असा झुबका दिसतो.
नक्षत्र छंद मांडला तर्फे नेहमीच अशा अनेक खगोलीय घटांनाबद्दल उद्बोधन करण्यात येत असते आणि यापूर्वी अनेक खगोलीय घटना पाहण्यासाठी आयोजन करण्यात येते. धूमकेतू पाहण्याचे म्हणजेच या खगोलीय घटनेचे साक्षीदार होण्याचे भाग्य आपल्याला लाभते आहे. तरी नक्षत्र छंद मंडळातर्फे आवाहन करण्यात येत आहे की सर्व खगोल अभ्यासकांनी खगोल प्रेमींनी या घटनेचा लाभ घ्यावा.
खगोल अभ्यासक
सौ. चेतना पाटील
(संचालिका- नक्षत्र छंद मंडळ नंदुरबार)
(९४२०७५५१४०)








