नवापूर l प्रतिनिधी
श्री गणेश जयंती निमित्ताने लोकनेते माणिकरावजी गावितपरिवाराच्या वतीने डोकारे (ता. नवापूर) येथील आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित, नंदुरबार जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती संगीता गावित, युवा उद्योजक धनंजय गावित व इंजि. मानस गावित यांच्या तर्फे शहरातील सर्व जाती धर्मातील नागरिकांसाठी महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम झाला. यावेळी हजारो नागरिकांनी लाभ घेतला.

श्री गणेश जयंती निमित्ताने सकाळ पासूनच सरदार चौकातील गणपती मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. प्रारंभी गणपती मंदिरात ११ पौरोहीत्यांच्या उपस्थितीत दुग्धाभिषेक करीत गणपती अथर्वशीर्षचे सहस्त्रावर्तन म्हणण्यात आले. तदनंतर डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित व नंदुरबार जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती संगीता गावित यांच्या हस्ते सत्यनारायणाची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी गणपती मंदिराचे अध्यक्ष प्रकाश पाटील व विश्वस्त मंडळ उपस्थित होते.
महाप्रसाद :
सायंकाळी साडेसहाला गणपती मंदिरा समोर सरदार चौकात व दिगंबर पाडवी क्रिकेट मैदानात शहरातील सर्व जाती धर्मातील नागरिकांसाठी स्नेहभोजन कार्यक्रम सुरु झाला. यात शहरातील बहुतांश नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.शहरातील गणेश मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे वाढपी सोबत भोजन वाढण्यासाठी सहकार्य केले. प्रत्येकाला भोजन मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली होती.ज्येष्ठ व वयोवृद्ध नागरिकांसाठी स्वतंत्र टिफिन ( डबा ) देण्यासाठी सहा टेबल लावून स्वतंत्र व्यवस्था असल्याने बहुतेकांनी टिफीन घेऊन गेले.
यावेळी नगरसेवक गिरीश गावित, पुष्पा गावित, जयवंत जाधव,अजय गावीत, यांच्यासह सुमाणिक प्राथमिक शाळा,स्वर्गीय सौ हेमलत वळवी अनुदानित प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा,पांघरण अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा कारेघाट, दादासाहेब माणिकरावजी गावित नागरी सहकारी पतसंस्था नवापूर, स्व.हेमालताताई वळवी सहकारी ग्राहक भांडार नवापूर, देवमोगरा गॅस एजन्सी, सुराई गो शाळा या संस्थेतील पदाधिकारी कर्मचारी व शहरातील विविध सामाजीक,धार्मिक संस्थेतील कार्यकर्ते यांनी महाप्रसाद वाटपाचे काम केले.