शहादा l प्रतिनिधी
शहादा महावितरण महिला कर्मचारी यांच्या कडुन हळदीकुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ६५ महिलांनी सहभाग नोंदवला होता .
महिला ही अबला नसून सबला आहे. आज प्रत्येकच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. त्या काळातील इतिहासाकडे देखील आपण नजर फिरविली तर नारी शक्तीची प्रचिती येते. संस्काराच्या जपणुकीसह महिलांनी हवे त्या क्षेत्रामध्ये प्रगती गाठण्यासाठी अंगी आत्मविश्वास महत्वाचा आहे आणि हाच आत्मविश्वास वाढविण्यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवित आहोत असे तृप्ती सुजित पाटील यांनी सागितले.
महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी महिला महावितरण कठीबध्द आहे असे प्रतिपादन दिव्या पाटील यांनी केले .
महावितरणचा शहादा एकलव्य पतसंस्था येथे हळदी कुंकू कार्यक्रम व महिला मेळाव्याचे आयोजन मोठ्या थाटात व उत्साहात पार पडले. यावेळी सोनल लाडकर . शिला भुषण जगताप,जयश्री सोनवणे .सुवर्णा माळी . सुरेखा तडवी . दिपाली तमखाने. काजल मराठे आदिनी प्ररिश्रम घेतले.
यावेळी महिला मान्यवरांनी महिलांना मार्गदर्शन केले दरम्यान उपस्थित महिलांना हळदी-कुंकू लावून वाण वाटप करण्यात आले सोबतच महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोनाली लाडकर केले तर आभार जयश्री सोनवणे यांनी मानले.