नंदूरबार l प्रतिनिधी
डॉ.हेडगेवार सेवा समिती नंदुरबार संचलित अनुदानित आश्रमशाळा जळखे ता.जि.नंदुरबार येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण संस्था अध्यक्ष कृष्णदास पाटील यांचे हस्ते संपन्न झाले. तसेच आश्रमशाळेच्या स्थापनेला 25 वर्ष होत असल्याने हे वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. त्याच्या फलकाचे अनावरण ज्येष्ठ सल्लागार ललित पाठक यांचे हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी अध्यक्षस्थानी कृष्णदास काशिनाथ पाटील (अध्यक्ष ,डॉ.हेडगेवार सेवा समिती), तर सौ.देखमुताई गावित ( सरपंच,जळखे) यांची प्रमुख उपस्थिती होती. नंदुरबार तालुक्यातील जळखे येथे डॉ.हेडगेवार सेवा समिती नंदुरबार संचलीत अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा येथे दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणासह विविध कार्यक्रम आयोजित केले जातात यावेळी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी चित्त थरारक मनोरे व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले, यावर्षी या कार्यक्रमासोबतच शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे विश्वस्थ धनराज कातोरे, पाटील भाऊ माळी, ज्येष्ठ सल्लागार ललित पाठक, नानाभाऊ माळी, संस्थेच्या सर्व युनिट चे प्रमुख व विकास सहयोगी आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि विकास सहयोगीनी परिश्रम घेतले.