नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील वृंदावन कॉलनीत चोरट्यांनी घरफोडी करीत रोकडसह सोने-चांदीचे दागिने असा सुमारे अडीच लाखाचा ऐवज चोरुन नेला.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार येथील रविंद्र पन्नालाल गंगवल यांचे वृंदावन कॉलनीत घर आहे. सदर बंद घराच्या दरवाजाचा कडीकोडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करीत घरात असलेली ९० हजाराची रोकड व १ लाख ४२ हजार रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने व एक कॅमेरा असा एकूण २ लाख ३२ हजाराचा ऐवज चोरुन नेला. याबाबत रविंद्र गंगवाल यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३८०, ४५४, ४५७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रशांत राठोड करीत आहेत.








