नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील डी आर शाळेत या शैक्षणीक वर्षाच्या आनंद बाजारात विद्यार्थ्यांनी व
शिक्षकांनी घरगुती बनविलेले पदार्थ खाण्याचा मनमुराद आनंद लुटला.शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान कळावा. श्रमप्रतिष्ठा, खरी कमाई, व्यवहार चातुर्य गुण संपादन होणे हा असून त्या अनुषंगाने कोणता ही व्यवसाय उभारणे भांडवल कसे उभारावे?लागणारे साहित्य ,या बाबत माहिती व्हावी.या साठी आनंद बाजार भरविण्यात आला.
यात विद्यार्थ्यांनी कचोरी,भेळ,पाणीपुरी, पोहे,कांदा भजी,उसळ,चहा, इडली,असे नानाविध पदार्थ विक्री साठी ठेवले होते.याचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक नारायण भदाणे, पर्यवेक्षक पंकज पाठक, पर्यवेक्षक विपुल दिवाण,संजय सैंदाणे,योगेश गवते,मंगेश उपासनी,सन्दिप् चौधरी आदी च्या उपस्थित करण्यात आला.या सोबत विद्यार्थ्यांनी विविध गाणे वर ठेका धरत नाचण्याचाही आनंद लुटला.वरील कार्यक्रम यशस्वीते साठी योगेश गवते,प्रशांत पाटील,दिनेश वाडेकर,हेमंत खैरनार,निलेश गावित व खंडू जाधव,मनोज,अहिरे परुळेकर व शिक्षक शिक्षिका यांनी परिश्रम घेतले.