नवापूर l प्रतिनिधी
नवापुर शहरात मोकाट फिरणान्या कुत्र्यांचा बंदोबस्त होणे बाबत चे निवेदन नवापुर शरतील कचेरी रॉड परिसरातील नागरिकांनी मुख्यधिकारी सप्नील मुधलवाडकर यांना दिले आहे.
त्यांनी निवेदना मध्ये म्हटले आहे की नवापुर शहरातील पोलिस स्टेशन रोड नवापुर परिसरातील नागरिक आपणकडे निवेदन सादर करितो की, पोलिस स्टेशन रोड नवापूर परिसरात अनेक मोकाट कुत्रे फिरतात, व येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तिच्या मागे लागतात तसेच वाहन चालवणंऱ्याच्या मागे धावतात यामुळे अनेक दुचाकी चलविणारे नागरिकांचा घाबरून अपघात झाला आहेत व त्यांना गंभीर जखमा देखील झाल्या आहेत. तसेच कोंबड्या बकऱ्या, मांजरी यांच्या मागे लागून चावा घेतात. रात्री, पहाटे बाहेरगावाहून येणाऱ्या व्यक्तींच्या मागे लागुण चावा घेतात.
यांच्या परिसरात लहान मुले खेळत असताना त्यांचाही मागे धावतात व त्याना ही चावा घेतात किंवा घाबरून खेळणारी मुले पडतात व त्यांना जखमा देखील झालेल्या आहेत तरी आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही
करून मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. यामुळे कोणाची जीवित हानी झाल्यास याची सर्वस्वी जवाबदारी हि नवापुर नगरपरिषद प्रशासनाची राहील याची नोंद घेऊन असे निवेदना मध्ये म्हटले आहे निवेदनावर रहिवासी मनोज बोरसे,दिपक भावसार,यश पगारे,दिनेश नगराळे,हेमंत पाटील,आबा मोरे,उमर शेख,सोहेब शेख,आसिफ कपाटवाला,दिपक मोरे सह असंख्य नागरीकांचा सह्या आहेत.








