शहादा l प्रतिनिधी
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन व समुपदेशन या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयाच्या महात्मा गांधी सभागृहात संपन्न झालेल्या सदर व्याख्यानास शहादा येथील नामवंत डॉ. सुभाष पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या श्रीमती कल्पना पटेल या होत्या. यावेळी पर्यवेक्षक प्रा.के.एच. नागेश, प्रा. विजय डोळे, प्रा.अशोक पाटील, प्रा. अरविंद पाटील, प्रा. लक्ष्मण बोरसे, प्रा.शिवनाथ पटेल, प्रा.श्रीमती रेखा पाटील आदींची उपस्थिती होती.
डॉ.सुभाष पाटील यांनी इयत्ता बारावी नंतर उपलब्ध असणाऱ्या विविध शैक्षणिक विद्याशाखांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कुमारवयीन विद्यार्थ्यांचे भावविश्व आणि शिक्षण यावर चर्चात्मक संवाद साधला. शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी व कौटुंबिक जबाबदारी देखील महत्त्वाची असते हे पटवून दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा उपप्राचार्या श्रीमती कल्पना पटेल यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मानवी जीवनातील शिक्षणाचे महत्त्व याविषयी माहिती दिली. ‘परीक्षेला सामोरे जातांना’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. प्रकाश चौधरी यांनी केले. आभार प्रा.उर्मिला पावरा यांनी मानले.








