नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध झाली असून या ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने वर्चस्वाचा अधिकृत झेंडा फडकविला आहे. यात खडकी ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदी अनिता शर्मा नाईक, झापी ग्रा.पं.च्या उपसरपंचपदी आतल्या गुमदा नाईक, भादल ग्रा.पं.च्या उपसरपंचपदी केसलीबाई शंकर पावरा, सिंदीदिगर ग्रा.पं.च्या उपसरपंचपदी जागल्या काहर्या नाईक, भाबरी ग्रा.पं.च्या उपसरपंचपदी तेरशा रायसिंग पावरा, उडदया ग्रा.पं.च्या उपसरपंचपदी ठुमल्या जान्या पावरा यांची बिनविरोध निेवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष तथा खडकीचे लोकनियुक्त सरपंच सिताराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली झाली. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून तोरणमाळ भागात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी आदिवासी विकास मंत्री अॅड.के.सी.पाडवी यांच्या वर्चस्वाला धक्का देणारा निकाल आहे.

धडगाव (अक्राणी) तालुक्यातील 47 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका नुकत्याच पार पडल्या. या निवडणूकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने 6 ग्रामपंचायतींवर अधिकृतरित्या वर्चस्वाचा झेंडा फडकविला आहे. लोकनियुक्त सरपंच देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निवडून आले आहेत. या सहा ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदाच्या निवडीत देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे उपसरपंच बिनविरोध झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अॅड.राऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष तथा खडकी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच सिताराम नुरला पावरा यांच्या नेतृत्वाखाली अक्राणी तालुक्यातील 6 ग्रामपंचायतींच्या उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली.
खडकी ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदी अनिता शर्मा नाईक, झापी ग्रा.पं.च्या उपसरपंचपदी आतल्या गुमदा नाईक, भादल ग्रा.पं.च्या उपसरपंचपदी केसलीबाई शंकर पावरा, सिंदीदिगर ग्रा.पं.च्या उपसरपंचपदी जागल्या काहर्या नाईक, भाबरी ग्रा.पं.च्या उपसरपंचपदी तेरशा रायसिंग पावरा, उडदया ग्रा.पं.च्या उपसरपंचपदी ठुमल्या जान्या पावरा यांची बिनविरोध निवड झाली आहे. यातील विशेष म्हणजे भादल ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी 85 वर्षाच्या केसलीबाई शंकर पावरा यांची बिनविरोध निवड करून आदर्श निर्माण करण्यात आला आहे. या सहा ग्रामपंचायतींवर पुर्णपणे वर्चस्वाचा झेंडा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला फडकविण्यात यश आले आहे.या नवनियुक्त लोकनियुक्त सरपंच व बिनविरोध निवडून आलेल्या उपसरपंचांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अॅड.राऊ मोरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष तथा खडकीचे लोकनियुक्त सरपंच सिताराम पावरा, झापीचे सरपंच गिता पावरा, भादलचे सरपंच बुरका पावरा, सिंदीदिगरचे सरपंच सोमाबाई पावरा, भाबरीचे सरपंच सायमल पावरा, उडदयाचे सरपंच लावीबाई पावरा आदींनी कौतुक केले आहे.








