Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अक्राणी तालुक्यात 6 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपसरपंच बिनविरोध

माजी मंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांना तोरणमाळ भागातून धक्का देणारा निकाल

team by team
January 19, 2023
in राजकीय
0
अक्राणी तालुक्यात 6 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपसरपंच बिनविरोध

नंदुरबार  l प्रतिनिधी

 

धडगाव तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींच्या उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध झाली असून या ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने वर्चस्वाचा अधिकृत झेंडा फडकविला आहे. यात खडकी ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदी अनिता शर्मा नाईक, झापी ग्रा.पं.च्या उपसरपंचपदी आतल्या गुमदा नाईक, भादल ग्रा.पं.च्या उपसरपंचपदी केसलीबाई शंकर पावरा, सिंदीदिगर ग्रा.पं.च्या उपसरपंचपदी जागल्या काहर्‍या नाईक, भाबरी ग्रा.पं.च्या उपसरपंचपदी तेरशा रायसिंग पावरा, उडदया ग्रा.पं.च्या उपसरपंचपदी ठुमल्या जान्या पावरा यांची बिनविरोध निेवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष तथा खडकीचे लोकनियुक्त सरपंच सिताराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली झाली. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून तोरणमाळ भागात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी आदिवासी विकास मंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांच्या वर्चस्वाला धक्का देणारा निकाल आहे.

 

धडगाव (अक्राणी) तालुक्यातील 47 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका नुकत्याच पार पडल्या. या निवडणूकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने 6 ग्रामपंचायतींवर अधिकृतरित्या वर्चस्वाचा झेंडा फडकविला आहे. लोकनियुक्त सरपंच देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निवडून आले आहेत. या सहा ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदाच्या निवडीत देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे उपसरपंच बिनविरोध झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अ‍ॅड.राऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष तथा खडकी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच सिताराम नुरला पावरा यांच्या नेतृत्वाखाली अक्राणी तालुक्यातील 6 ग्रामपंचायतींच्या उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली.

 

 

 

 

खडकी ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदी अनिता शर्मा नाईक, झापी ग्रा.पं.च्या उपसरपंचपदी आतल्या गुमदा नाईक, भादल ग्रा.पं.च्या उपसरपंचपदी केसलीबाई शंकर पावरा, सिंदीदिगर ग्रा.पं.च्या उपसरपंचपदी जागल्या काहर्‍या नाईक, भाबरी ग्रा.पं.च्या उपसरपंचपदी तेरशा रायसिंग पावरा, उडदया ग्रा.पं.च्या उपसरपंचपदी ठुमल्या जान्या पावरा यांची बिनविरोध निवड झाली आहे. यातील विशेष म्हणजे भादल ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी 85 वर्षाच्या केसलीबाई शंकर पावरा यांची बिनविरोध निवड करून आदर्श निर्माण करण्यात आला आहे. या सहा ग्रामपंचायतींवर पुर्णपणे वर्चस्वाचा झेंडा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला फडकविण्यात यश आले आहे.या नवनियुक्त लोकनियुक्त सरपंच व बिनविरोध निवडून आलेल्या उपसरपंचांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अ‍ॅड.राऊ मोरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष तथा खडकीचे लोकनियुक्त सरपंच सिताराम पावरा,  झापीचे सरपंच गिता पावरा, भादलचे सरपंच बुरका पावरा, सिंदीदिगरचे सरपंच सोमाबाई पावरा, भाबरीचे सरपंच सायमल पावरा, उडदयाचे सरपंच लावीबाई पावरा आदींनी कौतुक केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

म्हारी छोरी छोरो से कम है के ? नंदुरबारची श्रावणी कुस्तीत नाशिक विभागात दुसरी

Next Post

भगदरीचा खुटंमाळ येथील आगीत जळून दोन घरे नष्ट, आ.आमश्या पाडवी यांनी भेट घेत केले सांत्वन

Next Post
भगदरीचा खुटंमाळ येथील आगीत जळून दोन घरे नष्ट,  आ.आमश्या पाडवी यांनी भेट घेत केले सांत्वन

भगदरीचा खुटंमाळ येथील आगीत जळून दोन घरे नष्ट, आ.आमश्या पाडवी यांनी भेट घेत केले सांत्वन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add