Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

के.व्ही. पटेल कृषी महाविद्यालयाच्या रासेयो शिबिरात पथनाट्याचे सादरीकरण

team by team
January 18, 2023
in शैक्षणिक
0
के.व्ही. पटेल कृषी महाविद्यालयाच्या रासेयो शिबिरात पथनाट्याचे सादरीकरण
शहादा l प्रतिनिधी
   पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित के.व्ही. पटेल कृषी महाविद्यालयाचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांनी ‘जमिनीचे आरोग्य व कृषी शिक्षणाचे महत्त्व’ या विषयावर पथनाट्याचे सादरीकरण केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिराअंतर्गत पिंप्री येथील गणेश मनीलाल पाटील यांच्या शेतावर शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात विद्यार्थ्यांकडून जलदिंडी, पर्यावरण जनजागृती, धुम्रपान निषेध आदी विषयांवर प्रबोधनात्मक फेरी काढण्यात आली.
विद्यार्थ्यांनी गावात तसेच मंदिर व शाळा परिसरात स्वच्छता अभियान राबविले. वृक्षारोपणाचा कार्यक्रमही घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या वतीने जमिनीचे आरोग्य व शिक्षणाचे महत्त्व या विषयावर पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. ग्रामस्थांनी पथनाट्यास उस्फूर्त प्रतिसाद दिला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी. एल. पटेल, कार्यक्रम अधिकारी प्रा .पी.वाय. पेंढारकर,महाविद्यालयाचे  प्राध्यापक, इतर कर्मचारी रासेयो स्वयंसेवक, ग्रामस्थ यांनी शिबिरात सहभाग नोंदविला. शिबिरासाठी मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा .मकरंद पाटील, प्राचार्य डॉ.प्रकाश पटेल यांचे मार्गदर्शन लाभले.
बातमी शेअर करा
Previous Post

महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये नंदुरबार जिल्हा पोलीस दलाची चमकदार कामगिरी

Next Post

आर्टिफेस्ट 2023या कला महोत्सवाचे 9 फेब्रुवारी रोजी आयोजन

Next Post
आर्टिफेस्ट 2023या कला महोत्सवाचे 9 फेब्रुवारी रोजी आयोजन

आर्टिफेस्ट 2023या कला महोत्सवाचे 9 फेब्रुवारी रोजी आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add