Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये नंदुरबार जिल्हा पोलीस दलाची चमकदार कामगिरी

team by team
January 18, 2023
in राज्य
0
महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये नंदुरबार जिल्हा पोलीस दलाची चमकदार कामगिरी

नंदुरबार | प्रतिनिधी-

 

नाशिक येथे झालेल्या राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने चमकदार कामगिरी केली. राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये सांघिक व वैयक्तिक खेळातून प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंची ऑल इंडिया पोलीस गेम्स स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

 

 

३३ वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा दि.७ ते १३ जानेवारी दरम्यान राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ०१ व ०२ येथील मैदानावर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये सांघिक व वैयक्तिक खेळ असे एकुण १८ क्रीडा प्रकारांमध्ये १३ संघातील २ हजार ५९० खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. सदर स्पर्धेमध्ये पुरुष गटात सर्वाधिक पदके मिळवत राज्य राखीव पोलीस दलाच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले तर प्रशिक्षण संचालनालयाच्या महिला संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. ३३ वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारातील एकुण १८ खेळाडूंची नाशिक परिक्षेत्रीय संघात निवड करण्यात आली होती.

 

 

 

त्यापैकी पुरुषांच्या हातोडा फेक या क्रीडा प्रकारात नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे नेमणुकीस असलेले पोलीस अंमलदार हेमंत बारी यांनी ५१.१० मी. हातोडा फेकत प्रथम क्रमांक, तर विसरवाडी पोलीस ठाणे येथे नेमणुकीस असलेले पोलीस अंमलदार भुषण चित्ते यांनी ४४.७३ मी. हातोडा फेकत द्वितीय क्रमांक पटकाविला.वुशु या महिलांच्या ४९ किलो वजन क्रीडा प्रकारात निंबाबाई वाघमोडे यांनी प्रथम व तायक्वांदो या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावून उत्कृष्ट महिला खेळाडूचा पुरस्कार आपल्या नावावर केला. तसेच पुरुषांच्या बॉक्सींग या क्रीडा प्रकारात ५१ किलो वजन गटात पोलीस अंमलदार विश्वास वळवी यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला.

 

 

 

 

तसेच पुरुषांच्या हॅण्डबॉल या क्रीडा प्रकारात नाशिक परिक्षेत्र संघाने नागपुर शहराचा ३२-२१ असा पराभव करत तृतीयक्रमांक पटकाविला. या संघात नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदार अबिद रोटिवाला, आनंदा मराठे, राहुल गवळी व राजेश गांगुर्डे यांचा सहभाग होता. ३३ वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी पोलीस अधिकारी गटातून शूटींग या क्रीडा प्रकारामध्ये दुसरे स्थान पटकावून नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील, नाशिक परिक्षेत्र संघात निवड झालेल्या पदक प्राप्त सर्व खेळाडूंचा सन्मान करुन पारितोषिक देवून गौरव करण्यात आला.महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये सांघिक व वैयक्तिक खेळातून प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंची ऑल इंडिया पोलीस गेम्स स्पर्धेसाठी निवड करण्यात येत असते.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर शहरात नगर पालिकेने १७० दुकानांचे अतिक्रमण काढले, अनेक ठिकाणी झाली शाब्दिक चकमक

Next Post

के.व्ही. पटेल कृषी महाविद्यालयाच्या रासेयो शिबिरात पथनाट्याचे सादरीकरण

Next Post
के.व्ही. पटेल कृषी महाविद्यालयाच्या रासेयो शिबिरात पथनाट्याचे सादरीकरण

के.व्ही. पटेल कृषी महाविद्यालयाच्या रासेयो शिबिरात पथनाट्याचे सादरीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add