नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार येथील जि.प.समोर महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्या विविध मागण्यांबाबत धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच याबाबत प्रशासनास निवेदन देण्यात आले. सदर मागण्या मान्य न झाल्यास दि.२३ जानेवारी रोजीपासून बेमुदत काम बंद करुन मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेने निवेदनातून दिला आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की, सहा वर्षापासून राज्यभरात सेवा देणाऱ्या सुमारे १० हजार समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या समस्या व आर्थिक नुकसानीबाबत वेळोवेळी लेखी निवेदन, मेल करण्यात आले आहे. मात्र सदर निवेदनांची दखल घेण्यात आलेली नाही. तसेच समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना सेवेत कायम करुन गट ‘ब’ अधिकाऱ्यांचा दर्जा मिळावा, सर्व सुमदाय आरोग्य कर्मचाऱ्यांना कायम करावे, केंद्र शासनाप्रमाणे ४० हजार मानधनावर वार्षिक वेतनवाढ व बोनस मिळावा,
निश्चित वेतन व कामावर आधारीत वतेन यांचे प्रमाण करावे, बदली संदर्भात धोरण निश्चित करावे, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार बढती द्यावी, हार्ड एरिया अलाऊंस देण्यात येणाऱ्या क्षेत्राच्या यादीत समाविष्ट क्षेत्राचा अंतर्भाव करावा, टी.ए.,डी.ए. मिळावा आदी मागण्यांचा समावेश निवेदनातून करण्यात आला आहे. तसेच सदर मागण्या मान्य न झाल्यास दि.२३ जानेवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलनाचाही इशारा देण्यात आला आहे. काल नंदुरबार जि.प.समोर धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष तुषार धामणे, उपाध्यक्ष दिपाली पाडवी, सचिव डॉग़ौरव सोनवणे,कोषाध्यक्ष डॉ.शशिकांत खैरनार आदींसह शेकडो समुदाय अधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.








