शहादा l का.प्र.
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा येथील राष्ट्रीय सेवा योजना एककातर्फे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त विद्यापीठ स्तरीय ऑनलाईन प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
युवकांना स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासाविषयी माहिती व्हावी या उद्देशाने प्रश्नावली तयार करण्यात आली. या उपक्रमात संपूर्ण विद्यापीठ परिसरातील 481 विद्यार्थ्यानी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना ई-मेल द्वारे प्रमाणपत्र देण्यात आले. रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. वजीह अशहर यांनी तांत्रिक नियोजन हाताळले. तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा .राजेंद्र पाटील व डॉ. वर्षा चौधरी यांनी प्रश्नावली पूर्ण केली. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यापीठ परिसरातील सर्व रासेयो कार्यक्रम अधिकाऱ्यांनी सहकार्य केले.
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, मानद सचिव श्रीमती कमलताई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील, प्राचार्य डॉ. आर.एस.पाटील, उपप्राचार्य डॉ. एम.के.पटेल, डॉ. एस.डी. सिंदखेडकर यांनी उपक्रमाचे कौतुक केले.








