Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अपंग युनिट समायोजित प्राथमिक शिक्षकांना वेतन अदा, प्रहार शिक्षक संघटनेच्या पाठपुरावाला यश 

team by team
January 16, 2023
in राज्य
0
अपंग युनिट समायोजित प्राथमिक शिक्षकांना वेतन अदा, प्रहार शिक्षक संघटनेच्या पाठपुरावाला यश 

नंदुरबार   l  प्रतिनिधी

 

केंद्रीय पुरस्कृत अपंग एकात्मिक योजनेतील समायोजनाद्वारे प्राथमिक शिक्षकांची मा. उपसचिव शालेय शिक्षण शिक्षण संचालक नियुक्ती आदेश व उमेदवारांचे शैक्षणिक अहर्ता, छायांकित कागदपत्रांचे आधारे नंदुरबार जिल्हा परिषद शिक्षण विभागाने नियुक्ती आदेश देण्यात आले होते. स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत प्राथमिक शाळांमधील रिक्त पदांवर सामावून घेण्यात आले होते.

 

 

 

 

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद सेवेत लागलेल्या अपंग युनिट अंतर्गत समावेशन केलेल्या प्राथमिक शिक्षकांना नंदुरबार जिल्हा वगळता इतर जिल्हा परिषदेकडून वेतन अदा  करण्यात  होते. 41 प्राथमिक शिक्षक विनावेतन काम करत असल्याने शिक्षकांवर कुटुंबाची उपासमारीची वेळ होती. शिक्षकांच्या प्राप्त तक्रारीनंतर महाराष्ट्र राज्य नंदुरबार जिल्हा प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा मार्गदर्शक संजय गावीत, जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास देसाई यांनी निवेदनाद्वारे नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या खासदार मा.डॉ. हिना गावित, पालकमंत्री तथा आदिवासी विकास राज्यमंत्री  मा.ना.डॉ. विजयकुमार गावित, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे, माजी शालेय शिक्षण राज्यमंत्री  ओमप्रकाश बच्चुभाऊ कडू , शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे, विभागीय शिक्षण उपसंचालक नाशिक, अप्पर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, जि. प. उपाध्यक्ष सुहास नाईक, शिक्षण सभापती गणेशदादा पराडके, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कुमार पवार, मुख्य लेखा व वित्त आधिकारी अतुल गायकवाड, प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण यांच्याकडे प्रहार शिक्षक संघटनेचे निवेदन सादर करण्यात आले होते.

 

 

 

 

प्राथमिक शिक्षण संचनालय पुणे या कार्यालयातील अपंग एकात्मिक शिक्षण योजना समन्वयक संचालक प्राथमिक शिक्षण यांचे तसेच शालेय शिक्षण विभाग व ग्रामविकास विभाग या मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी अवर सचिव व उपसचिव दर्जाचे अधिकारी यांचे विशेष शिक्षकांना जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शाळांमधील रिक्त पदावर सामावून घेण्याची कार्यवाही बाबत पत्रव्यवहार झालेला होता. जिल्हा परिषद स्तरावर अपंग युनिटमधील विशेष शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये रिक्त पदावर सामावून पाच वर्ष झालेली होती तरी देखील वेतनापासून वंचित असणाऱ्या अपंग युनिट अंतर्गत 41 शिक्षक नियमित कार्यरत असून मागील पाच वर्षापासून वेतन बंद करण्यात आले होते.

 

 

 

 

त्यामुळे प्राथमिक शिक्षकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली होती. महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष विकास घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्हा प्रहार शिक्षक संघटनेमार्फत वाडी, वस्ती,पाड्यातील कार्यरत असणाऱ्या  विशेष शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी वेळोवेळी शासनास पाठपुरावा करण्यात आला होता. प्रहार शिक्षक संघटनेच्या निवेदनाची दखल घेऊन अपंग एकात्मिक शिक्षण योजनेतील विशेष शिक्षकांना प्रशासनाने व शिक्षण विभागाने विशेष शिक्षकांच्या वेतनासाठी रक्कम खात्यावर वेतन अदा करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य नंदुरबार जिल्हा प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा मार्गदर्शक संजय गावीत, जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास देसाई यांनी प्रशासनाचे व शिक्षण विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांचे आभार मानले आहे. यावेळी उत्तर देताना गोपाल गावीत यांनी नंदुरबार जिल्ह्यातील सर्वसामान्य शिक्षकांची अनेक प्रश्न जिल्हास्तरावर प्रलंबित आहेत. हे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य दिले जाईल . तसेच आगामी काळात संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात प्रहार  शिक्षक संघटनेचा ताकदीने विस्तार केला जाईल अशी ग्वाही दिली. गोपाल गावीत नंदुरबार जिल्हाध्यक्ष प्रहार शिक्षक संघटनेच्या कार्याबद्दल जिल्ह्यातील शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त विद्यापीठस्तरीय प्रश्नमंजुषेत 481 विद्यार्थ्यांचा सहभाग

Next Post

परदेशी पाहुण्यांनी धरला ढोल-लेझीमवर ठेका

Next Post
परदेशी पाहुण्यांनी धरला ढोल-लेझीमवर ठेका

परदेशी पाहुण्यांनी धरला ढोल-लेझीमवर ठेका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर  गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर गोदाघाट येथे सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभाचे पूजन

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add