शहादा l का.प्र.
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त युवा दिनाचे औचित्य साधून वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय शहादा येथे वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा. सौ. कल्पना पटेल, सुपरवायझर प्रा. के. एच. नागेश, प्रा. अरविंद पाटील उपस्थित होते.परिक्षक म्हणून काम प्रा. ए. पी. पाटील व प्रा. डॉ. डी. डी. पटेल यांनी केले. टाईमकिपर म्हणून काम प्रा. सौ. कल्पना निकुंम व प्रा. सौ. सुनिता पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन प्रा. मधुकर ठाकरे व प्रा. भारती पाटील यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेची प्रतिमा, स्वामी विवेकानंद यांची प्रतिमा राजमाता जिजाऊची प्रतिमा आणि स्व. कै. अण्णासाहेबांची प्रतिमा यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मधुकर ठाकरे यांनी केले तर निकाल वाचन प्रा. भारती पाटील यांनी केले.
वाद-विवाद स्पर्धेत एकूण आठ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यात प्रथम क्रमांक श्रुती जैन (अकरावी विज्ञान) हिने पटकावला, द्वितीय क्रमांक रोशनी शिंदे (अकरावी वाणिज्य) हिने पटकावला तर तृतीय क्रमांक श्रुती चौधरी (अकरावी विज्ञान) हिने मिळवला. कार्यक्रमाचे अध्यक्षांनी मार्गदर्शन करतांना विद्यार्थी आपल्यात असलेले कौशल्य ओळखून आपली प्रगती कशी करू शकतात याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अकरावी विज्ञान वर्गातील विद्यार्थिनी श्रुती जैन हिने केले तर कविता जगताप हिने आभार मानले.








