Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत शहादा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

team by team
January 16, 2023
in शैक्षणिक
0
रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत शहादा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
शहादा  l  का.प्र.
     पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला , विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित रस्ता सुरक्षा अभियानाच्या जनजागृतीसाठी शहादा पोलीस अधीक्षक आर.जी. मोरे व पोलिस विभागातील कर्मचारी युवराज पाटील यांनी महाविद्यालयातील युवकांना सखोल माहिती दिली .
    महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील होते.यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या कल्पना पटेल, पर्यवेक्षक प्रा.के.एच.नागेश,पोलिस अधिकारी श्री.राजन मोरे, कर्मचारी युवराज पाटील उपस्थित होते.
श्री.मोरे यांनी मार्गदर्शन करतांना म्हटले,रस्ता सुरक्षेची जबाबदारी युवा वाहनचालकांची असून सध्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे .तरुणांनी वाहन चालवतांना निश्चित ठरवून दिलेल्या वेगात चालवले पाहिजे. कर्णकर्कश आवाज देणाऱ्या हॉर्नचा वापर करू नये. यामुळे शाळा, न्यायालय ,व आजारी नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.मोटर सायकल धारकांनी हेल्मेटच्या वापर नियमित करावा.
व्यसनापासून दूर रहावे. नियमबाह्य प्रकार केल्यास आपण गुन्ह्यास पात्र राहणार असे मार्गदर्शन केले .कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. आर.एस.पाटील यांनी पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयात येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे ही निश्चितच कौतुकाची बाब आहे .या निमित्ताने विद्यार्थ्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव होईल. कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा.कल्पना पटेल, पर्यवेक्षक प्रा. के.एच  नागेश यांनीही मार्गदर्शन केले.यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू-भगिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रा. मनोज चौधरी यांनी केले.
बातमी शेअर करा
Previous Post

 शहादा आगारात रस्ता सुरक्षा पंधरवड्यास प्रारंभ

Next Post

माध्यमिक विद्यालय बिलाडी त.सा शाळेत आनंद मेळावा साजरा

Next Post
माध्यमिक विद्यालय बिलाडी त.सा शाळेत आनंद मेळावा साजरा

माध्यमिक विद्यालय बिलाडी त.सा शाळेत आनंद मेळावा साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add