शहादा l प्रतिनिधी
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा यांचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर दि .16 ते 22 जानेवारी दरम्यान पुरुषोत्तम नगर ता. शहादा येथे आयोजित करण्यात आले आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत ‘युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास’ या स्लोगनखाली दि. 16 रोजी विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन दुपारी तीन वाजता मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सौ.जयश्रीताई दीपक पाटील, सातपुडा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक पाटील,सरपंच सौ. कोकिळाबेन अशोक पाटील, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सचिन नांद्रे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एस. पाटील, रासेयो समन्वयक नंदुरबार जिल्हा प्रा.डाॅ. विजय पाटील, पुरुषोत्तम नगरचे ग्राम विकास अधिकारी एम.बी. चव्हाण, पोलीस पाटील जाधव प्रयाग पाटील, उपसरपंच जयश्री मुकेश पटेल, मुख्याध्यापिका वाल्मिकी विद्यालय सीमा तुषार पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. तुकाराम गावीत ,सातपुडा शुगरचे वित्त मॅनेजर छोटूलाल गिरधर पाटील आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या शिबिरात दररोज सकाळी साडेपाच ते सव्वा सात वाजे दरम्यान नैमित्तिक योगासन व हजेरी, आठ ते बारा श्रमदान- सर्वेक्षण-जनजागृती, दुपारी तीन ते पाच बौद्धिक प्रबोधन-चर्चासत्र-गटचर्चा, रात्री आठ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम व अहवाल लेखन अशी दिनचर्या राहणार आहे.शिबिरा दरम्यान दि.16 जानेवारी रोजी डॉ.वजीह अशहर (डिजिटल इंडिया सर्वेक्षण) डॉ. वर्षा चौधरी (पथनाट्य कार्यशाळा), दि.17 रोजी गुणवंत पाटील (जलसंधारण काळाची गरज) स्वाती पाटील (ग्रामविकास व युवक),
दि. 18 जानेवारी सुवर्णा जगताप (आनंदी तरुणाई आनंदी समाज) डॉ. तुषार पटेल (सोशल मीडिया), दि. 19 जानेवारी मोनाली पाटील, पुष्पांजली पाटील, नीलिमा साळवे (महिला आरोग्य तपासणी), सुनील निकम (लेस कॅश टू कॅशलेस) प्रीतम निकम (स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव), दि.20 रोजी डॉ.विवेक पाटील (डोळे तपासणी) सीमा पाटील (सशक्त युवा) रोशन पाटील (व्यक्तिमत्व विकास), दि. 21 जानेवारी डॉ. एस.एस.भांडे (पर्यावरण संवर्धन) डॉ. वाय. के.शिरसाठ (लोकसंस्कृती व युवक), दि. 22 जानेवारी डॉ.सुभाष पाटील (युवकांचे मानसिक आरोग्य) या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.शिबिरात माझी वसुंधरा अभियान, अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक आर्थिक सर्वेक्षण, मतदार आधार जोडणी, पाणीबचत, जलसाक्षरता, जलसंधारण, नदी स्वच्छता, बेटी बचाव बेटी पढाव, आपत्ती व्यवस्थापन, रस्ता सुरक्षा, महिला आरोग्य व सुरक्षा, पर्यावरण समुपदेशन, पर्यावरण सर्वेक्षण, सार्वजनिक स्वच्छता, सोशल मीडिया,जाती मुक्त भारत, डेंग्यू निर्मूलन जागृती, बालविवाह कायदा, रस्ता सुरक्षा, सुरक्षित वाहतूक, ग्रामविकास, प्लास्टिक मुक्ती, वाचन प्रेरणा, पथनाट्य, डिजिटल बँकिंग,ऊर्जा बचत, जनधन योजना, व्यसनमुक्ती, साक्षरता मिशन आदी प्रकल्प व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरा दरम्यान मोफत डोळे तपासणी शिबिर, महिला आरोग्य तपासणी शिबिर, बालक युवक संवाद आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
शिबिराचा समारोप रविवार दि. 22 जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता मंडळाचे उपाध्यक्ष जगदीश गिरधर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. यावेळी मंडळाचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील, विभागीय समन्वयक रासेयो प्रा .आर.डी.मोरे, उपप्राचार्य डॉ.एम.के.पटेल, डॉ. एस.डी. सिंदखेडकर, वरिष्ठ प्रा.डॉ.आय.जे. पाटील, माजी कार्यक्रमाधिकारी डॉ.यशवंत शिरसाठ, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य कल्पना पटेल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शिबिर यशस्वीतेसाठी पी.के. अण्णा पाटील फाउंडेशन शहादा, ग्रामपंचायत पुरुषोत्तम नगर, राष्ट्रीय सेवा योजना सल्लागार समिती व माजी स्वयंसेवकांचे विशेष सहकार्य लाभत असून उपस्थितीचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.एस.पाटील यांनी केले आहे. शिबिर यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ. एम. के. पटेल, डॉ.एस.डी. सिंदखेडकर,प्रा.कल्पना पटेल, कार्यक्रम अधिकारी व शिबिर प्रमुख प्रा .राजेंद्र पाटील, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा.वर्षा चौधरी, प्रा.डाॅ.वजीह अशहर, मनीलाल पाटील, गणेश पाटील, विजेंद्र निकम आदी परिश्रम घेत आहेत.








