Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा येथे गावठी रिव्हॉल्वर व काडतूस जप्त एकाविरुद्ध गुन्हा दाखल

team by team
January 16, 2023
in क्राईम
0
तळोदा येथे गावठी रिव्हॉल्वर व काडतूस जप्त एकाविरुद्ध गुन्हा दाखल
तळोदा l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील करडे येथे गावठी रिव्हॉल्व्हर  व जिवंत काडतुस  विकताना एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी तळोदा पोलिसात सदर संशयित विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोदा तालुक्यातील करडे येथील अक्षय निजाम पाडवी (वय 32 रा. करडे) हा गावातील हनुमान मंदिराजवळ सार्वजनिक जागी बेकायदेशीररित्या गावठी बनावटीचे रिव्हॉल्व्हर व जिवंत काडतूस बाळगून असल्याची खात्रीशीर बातमी पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे, असइ संगीता बाविस्कर, गौतम बोराळे, अजय पवार, राजू जगताप, विजय बीसावे, तुकाराम पावरा, चंद्रसिंग वसावे यांना मिळाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल यांनी दोन पंचांना पोलीस स्टेशनला बोलवून खात्री करून घेतली.
त्यानंतर पोलिसांनी सदर गावात जाऊन संशयित अक्षय निजाम पाडवी यास ताब्यात घेतले. त्याची अंग झडती घेतल्यानंतर कंबरेच्या उजव्या बाजूस गावठी पिस्तुल असल्याचे दिसले. शिवाय त्याच्या उजव्या खिश्यात जीवत काडतुसे मिळून आले. या रिव्हॉलवरची किंमत 25 हजार व 3 हजार रुपयाची पितळी काडतुस असा एकूण २८ हजार रुपयांचा ऐवज जप्त करून पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले.
याबाबत पोहेकॉ तुकाराम फोपा पावरा यांच्या फिर्यादीवरून संशयित अक्षय निजाम पाडवी याच्याविरोधात भारतीय हत्यार कायदा कलम 3 चे उल्लंघन केल्याप्रकरणी तळोदा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल करीत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

भगदरीचा खुटंमाळ येथे शाॅटसर्किटमुळे आग लागुन  दोन घरे जळून खाक

Next Post

पदवीधर निवडणूकीसाठी जिल्ह्यात असतील २३ मतदान केंद्र

Next Post
पदवीधर निवडणूकीसाठी जिल्ह्यात असतील २३ मतदान केंद्र

पदवीधर निवडणूकीसाठी जिल्ह्यात असतील २३ मतदान केंद्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add