नवापूर l प्रतिनिधी
मा. दादासाहेब श्री. माणिकरावजी गावित सार्वजनिक हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज विसरवाडी येथे प्राध्यापक पदावर कार्यरत असलेले हर्षदिप दिवाणसिंग सोलंकी यांना यंदाचा मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीतर्फे दिला जाणारा कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्कार नुकताच ऑनलाईन प्रदान करण्यात आला.
त्यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय असुन ते मागील 4 वर्षापासून सरकारी रुग्णालय, मतिमंद शाळा येथे अन्नदान करत आहेत. ते मुळ बलदाणे येथील रहिवासी असुन त्यांनी गावात स्वखर्चाने बसण्याचे बाक दिले आहेत, गावाला जोडणारे रस्ते स्वतः पाठपुरावा करून केले आहेत. त्यांनी कमी वयात विविध राज्यस्तरीय पद देखील भूषविली आहेत. याचीच दखल घेऊन त्यांना पुरस्कार प्रदान झाला आहे. संस्थेचे अध्यक्ष भरत माणिकराव गावित यांनी विशेष कौतुक केले असुन, शाळेचे मुख्याध्यापक एस.एच. सोनार यांनी देखील कौतुक केले आहे.