Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भूमि अभिलेखच्या विभागीय क्रिडा स्पर्धेत या स्पर्धेत नाशिकच्या संघाने मारली बाजी

team by team
January 16, 2023
in राज्य
0
भूमि अभिलेखच्या विभागीय क्रिडा स्पर्धेत या स्पर्धेत नाशिकच्या संघाने मारली बाजी

नंदुरबार | प्रतिनिधी

नंदुरबार येथील जिल्हा क्रीडा संकुलात भूमि अभिलेख, विभागाच्या नाशिक विभागीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत नाशिकचा संघ विजेता. तर जळगांव उपविजेता ठरला.

 

या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धेचे उदघाटन जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी नाशिक भूमि
अभिलेख विभागाचे प्र.उपसंचालक महेश शिंदे होते. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन जळगांव भूमि अभिलेखचे जिल्हा अधीक्षक मुगुटराव मगर, नगरचे भूमि अभिलेखचे जिल्हा अधीक्षक सुनिल इंदरकर, धुळे भूमि अभिलेखचे जिल्हा अधीक्षक प्रशात बिलोलीकर,नंदुरबार भूमि अभिलेखच्या जिल्हा अधीक्षक स्वाती लोंढे तसेच भूमि अभिलेख, कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष रवि डिक्रुज, कास्टाईब भूमि अभिलेख कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस विकास गोसावी,उपस्थित होते.११ जानेवारी रोजी के. डी. गावित सैनिकी शाळेच्या मैदानावर क्रिकेट स्पर्धा आयोजित करणेत आली होती. या स्पर्धेत नाशिकच्या संघाने विजय मिळविला. तर जळगांव उपविजेता ठरला.सायंकाळी व्ही.जी.लॉन्स मध्ये कर्मचार्‍यांतर्फे आयोजित विविध सांस्कृतिक  कार्यक्रमाचे उदघाटन महेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.यांत विभागातील कर्मचार्‍यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.१२ जानेवारी रोजी जिल्हा क्रीडा संकुलात वैयक्तीक क्रीडा स्पर्धाचे आयोजन करणेत आले होते.

 

 

त्यात नाशिक विभागाला सर्वसाधारण विजेतेपद देण्यात आले. कबड्डीच्या स्पर्धेत नाशिकचा संघ विजेता तर जळगांवचा संघ उपविजेता राहीला, पुरूष व्हॉलीबॉल स्पर्धेत नाशिक संघ विजेता व जळगाव संघ उपविजेता राहीला.पुरूषांच्या  फूटबॉल स्पर्धेत अहमदनगर संघ विजेता व नाशिक संघ उपविजेता.तर पुरूषांच्या खो.खो.च्या स्पर्धेत नाशिक संघ विजेता व जळगाव संघ उपविजेता राहीला. महिलांच्या खो-खो स्पर्धेत नाशिक संघ विजेता व जळगाव संघ उपविजेता ठरला. तसेच वैयक्कि स्पर्धेत १००,२००,४०० मीटर धावणे, लॉन टेनिस, टेबल टेनिस, बॅडमिन्टन, कॅरम, बुध्दीबळ, रिंग टेनिस, पोहणे,उंच उडी,लांब उडी,गोळा फेक,थाळी फेक,भाला
फेक,इत्यादी स्पर्धा घेणेत आल्या. स्पर्धा समारोपचा कार्यक्रमास प्रमख अतिथी हॅमर थ्रो मधील राष्ट्रीय पुरस्कार विजेता प्रतिक पिंगळे,नाशिक प्रदेश भूमि अभिलेख विभागाचे प्र.उपसंचालक महेश शिंदे,भूमि अभिलेखचे जिल्हा अधीक्षक मुगुटराव मगर, सुनिल इंदरकर प्रशात बिलोलीकर,स्वाती लोंढे यांचे हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना चषक व उपविजेत्यांना चषक देण्यात आले.

 

 

तसचे वैयक्तिीक स्पर्धेतील विजेत्यांना मेडल्स व प्रमाणपत्र देवुन गौरविण्यात आले.कार्यक्रमास उपअधीक्षक स्मिता गावित, नवापुर भूमि अभिलेखचे उपअधीक्षक शांताराम उशिरे,शहादयाचे भूमि अभिलेखचे उपअधीक्षक रामचंद्र कुवर, तळोदयाचे भूमि अभिलेखचे उपअधीक्षक सतिष बोरसे, अक्कलकुव्याचे भूमि अभिलेखचे उपअधीक्षक अरूण ठाकुर उपस्थित होते.तसेच
स्पर्धेसाठी विविध शाळेतील क्रीडा शिक्षक व क्रीडा संचालक मयुर ठाकरे यांनी पंचाची जबाबदारी पार पाडली, तसेच पंचायत समिती मधील वैदयकीय अधिकारी यांनी मेडीकल सुविधा उपलब्ध करून दिली. सुत्रसंचालन डॉ प्रा.माधव कदम, व धुळेचे भूमि अभिलेख उपअधीक्षक किरण पाटील, यांनी तर आभार मुख्यालय सहायक दिलीप बाविस्कर यांनी मानले, कार्यक्रम यशस्वीतसाठी
शिरस्तेदार प्रविण दुसाणे, महेंद्र राजपुत, देविदास पाटील व जिल्हयातील कर्मचार्‍यांनी परीश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

वेड व झुमकावाली पोर या गाण्यांच्या तालावर थिरकली तरुणाई

Next Post

विविध योजना, उपक्रमांद्वारे स्टार्टअप, युनिकॉर्न्सच्या विकासाला चालना

Next Post
विविध योजना, उपक्रमांद्वारे स्टार्टअप, युनिकॉर्न्सच्या विकासाला चालना

विविध योजना, उपक्रमांद्वारे स्टार्टअप, युनिकॉर्न्सच्या विकासाला चालना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add