Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पतंगोत्सवात नायलॉन मांजाचा वापराल तर होणार कडक कारवाई,जिल्ह्यात पोलीस दलाने स्थापन केले १३ पथके

team by team
January 14, 2023
in क्राईम
0
पतंगोत्सवात नायलॉन मांजाचा वापराल तर होणार कडक कारवाई,जिल्ह्यात पोलीस दलाने स्थापन केले १३ पथके
नंदुरबार l प्रतिनिधी
 पतंगोत्सवात नायलॉन मांजाचा वापर होऊ नये, त्याची विक्री होऊ नये यासाठी पोलिसांकडून विशेष दक्षता घेतली जात आहे. आतापर्यंत ९ गुन्हे दाखल होऊन ३१ हजारांचा मांजा जप्त झाला आहे. तरीही काही ठिकाणी त्याची विक्री होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यात पोलिस ठाणेनिहाय पोलिसांची १३ पथके स्थापन करण्यात आली आहेत.
नंदुरबार जिल्ह्यासह असलेल्या गुजरात राज्यातील गावांमध्ये मकरसंक्रांतीचा पतंगोत्सव साजरा करण्यात येतो. पतंगोत्सवाचा आनंद घेण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सहभागी होत असतात. आपली संस्कृती टिकवत असताना पर्यावरणाची काळजी व सांभाळ करणे हे देखील सर्वसामान्य नागरिकांचे एक कर्तव्य आहे. पतंगोत्सव साजरा करताना नायलॉन मांजा वापरामुळे निसर्गातील बरेच पशु, पक्षी वेळप्रसंगी लोकांना दुखापत होऊन आपला जीव देखील गमवावा लागला आहे. धाग्यामुळे प्राणघातक इजांपासून पक्षी व मानव जीवितांस संरक्षण करण्याची गरज आहे. दुर्मिळ व नष्टप्राय होत असलेल्या निष्पाप पक्ष्यांचे सरंक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी दिल्या होत्या.
नायलॉन मांजाची किरकोळ विक्री किंवा प्रमुख विक्रेत्याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे आवाहन केले होते. तरीदेखील नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार शहर पोलिस ठाण्याअंतर्गत ४ गुन्हे नंदुरबार उपनगर पोलिस ठाण्यात १, शहादा पोलिस ठाण्यात तर तळोदा पोलिस ठाणे येथे २ गुन्हे असे एकूण ९ नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करून ३१ हजार ९० रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आलेला आहे.
पतंग उडविताना केलेल्या नायलॉन मांजाच्या वापरामुळे विजेच्या तारांवर घर्षण होऊन आग लागणे, उपकेंद्र बंद पडणे, वीज उपकरणे बिघडणे, अपघात घडणे, इजा व जीवित हानी होणे अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्लास्टिक किंवा कृत्रिम वस्तूपासून बनविलेल्या नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेल्या पक्क्या धाग्याच्या वापराला पतंग उडविण्याच्या सणाच्या वेळी बंदी घालण्यात आलेली आहे. नायलॉन मांजाची किरकोळ विक्री किंवा प्रमुख विक्रेत्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ च्या कलमान्वये कारवाई करण्यात येईल.
ज्या वस्तूंपासून पर्यावरणास हानी पोहोचेल अशा नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक किंवा हाताळणी करणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात येईल तसेच नायलॉन मांजा विक्री व हाताळणी करताना आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल. तसेच पोलिस नियंत्रण कक्ष, नंदुरबार ०२५६४-२१०१००/२१०११३ यावर संपर्क साधावा असे आवाहन पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी केलेले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

शहादा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात . प्राथमिक शिक्षणाधिकारी सतिश चौधरी यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार

Next Post

स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांचा जयंती निमित्त मुलांना पतंग भेट

Next Post
स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांचा जयंती निमित्त मुलांना पतंग भेट

स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांचा जयंती निमित्त मुलांना पतंग भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

February 28, 2026
सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

February 28, 2026
मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

February 28, 2026
विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

February 28, 2026
जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

February 26, 2026
भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

February 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add