म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद ते इस्लामपूर रस्त्यावर दोन मोटार सायकलींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोन जण गंभीर झाले. अन्य दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत.याबाबत म्हसावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून माहिती अशी की, इस्लामपूर हुन दारासिंग दादला पावरा हा आपल्या पत्नी रविना व एक वर्षा चा मुलगा मोटार सायकल ( क्र.MH 39. 9826) वरून म्हसावद कडे जात होता. तर ( MH 39 X. 4274) ही मोटार सायकल ने म्हसावद हुन अरुण उत्तम पवार रा.इस्लामपूर हा आपल्या पत्नी ला घेऊन इस्लामपूर ला जात होते. त्यांच्यात समोरासमोर धडक होऊन अपघात झाला.
यात दारासिंग दादला पावरा रा.घाटली ता.धडगाव हा जागीच मयत झाला. तर त्यांची पत्नी रविना दारासिंग पावरा व 1 वर्षाचा मुलगा किरकोळ जखमी झाले. अरुण उत्तम पवार व त्याची पत्नी हे गंभीर दुखापत झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे.मयत दारासिंग पावरा याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र त्यास डॉक्टरांनी मयत घोषित केले मयताचे शव विच्छेदन डॉ.अलाउद्दीन शेख यांनी करून संध्याकाळी प्रेत नातेवाईक च्या ताब्यात दिले. याप्रकरणी अरुण उत्तम पवार यांच्या विरुद्ध म्हसावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक निवृत्ती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार राजेंद्र चव्हाण हे करीत आहे.








