नंदुरबार| प्रतिनिधी
नंदुरबार तालुकास्तरीय ४३ वे विज्ञान प्रदर्शन तालुक्यातील शेजवा येथे उत्साहात संपन्न झाले. यावेळी विविध गटातील १०० उपकरणांची मांडणी करण्यात आली होती. यावेळी प्राथमिक गटातून श्रीमती पुतळाबाई गजमल पाटील तर माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातून डी.आर.हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी प्रथमक क्रमांक पटकावला आहे.
नंदुरबार तालुक्यातील शेजवा येथील माध्यमिक विद्यालयात नंदुरबार तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. काल विज्ञान प्रदर्शनाचा समारोप झाला. यावेळी अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी प्राथमिक सतिष चौधरी तर प्रमुख म्हणून गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, माजी नगरसेवक यशवर्धन रघुवंशी, नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव पुष्पेंद्र रघुवंशी, नंदुरबार तालुका मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष कपुरचंद मराठे, केंद्रप्रमुख हिरामण वाघ, विस्तार अधिकारी एस.एम.पाटील, मुख्याध्यापक दत्तु पाटील व परिक्षक उपस्थित होते.
या प्रदर्शनात प्राथमिगक गट ३९, माध्यमिक ४४, उच्चमाध्यमिक १७ असे एकूण १०० उपकरणे तर शिक्षक गटातून ५, प्रयोगशाळा परिचर १, लोकसंख्या शिक्षण १ आशा उपकरणाची मांडणी करण्यात आली होती. यावेळी प्राथमिक गटातून प्रथम श्रीमती पुतळाबाई गजमल पाटील विद्यालय वैदाणे येथील विवेक बन्सीलाल पाटील, द्वितीय श्रीमती श्रॉफ हायस्कुल, प्रविण जितेंद्र भावसार तर तृतीय क्रमांक ए.एस.मिशनचा रिध्देश डी.नांद्रे यांनी क्रमांक पटकावला तर राखीव गटातून शासकीय आश्रमशाळा कोठली येथील शालिनी जगताप विजयी झाली.तर उत्तेजनार्थ बक्षीस ऍग्लो उर्दु हायस्कुल नंदुरबार येथील अबरार अकबर मोहम्मद मिर्झा यांना देण्यात आला. तर माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक निरव नारायण नांदुरकर (डी.आर.हायस्कुल,नंदुरबार), द्वितीय क्रमांक भुमिका कैलास पानपाटील (पी.के.पाटील ज्युनिअर कॉलेज,नंदुरबार), तृतीय क्रमांक भाविन किशोर बोरसे (देवरे माध्यमिक विद्यालय,विखरण), एस.टी.राखीव गटातून जयंतीलाल तडवी (महात्मा फुले हायस्कुल,नंदुरबार) तर उत्तेजनार्थ रितु रमेश वळवी (माध्यमिक विद्यालय शेजवा) यांना बक्षीसे देण्यात आली.
प्राथमिक शिक्षक गटातून नितीन ज्ञानेश्वर पाटील (एकलव्य विद्यालय,नंदुरबार), माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक गटातून योगेश काशिनाथ पाटील (एकलव्य विद्यालय,नंदुरबार), साहित्य निर्मिती गटातून इजाज शरीफ खाटीक (श्रीमती पुतळाबाई गजमल पाटील,वैदाणे), किरण बाबुलाल मराठे (एस.ए.मिशन हायस्कुल,नंदुरबार) यांनी बाजी मारली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले. यावेळी परिक्षक म्हणून सारंग बुवा, पी.एस.वळवी, एच.बी.पाटील यांनी काम पाहिले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजय पवार, आनंदराव पवार, रामानंद बागले, दिपक वळवी, संजय बोरसे, हारूख खा चिखलीकर, संजय वसावे, दिनेश पवार, नेहा शर्मा आदींनी सहकार्य केले.








