नंदुरबार । प्रतिनिधी-
खा. डॉ. हीना गावित यांच्या प्रयत्नाने सुरत- अमरावती ही आठवड्यातुन दोनवेळा धावणारी एक्सप्रेस दि.१९ जानेवारीपासून तीन दिवस धावणार आहे.
सुरत-अमरावती ही एक्सप्रेस रेल्वे यापुर्वी शुक्रवार व रविवार व अमरावती-सुरत एक्सप्रेस सोमवार व शनिवारी धाव होती. खा. डॉ. हीना गावित यांनी रेल्वे विभागाकडे पाठपुरावा करुन सदर रेल्वे दोन ऐवजी तीन दिवस धावण्याची मागणी केली होती. रेल्वे विभागाने त्याची दखल घेवून
सदर सुरत-अमरावती एक्सप्रेस आठवडयातून तीन दिवस सुरु केली आहे. त्यामुळे आता सुरत अमरावती एक्सप्रेस (२०९२५) ही सुरत स्थानकावरुन दर गुरुवार, शुक्रवार व रविवारी सुटेल. तसेच अमरावती- सुरत (२०९२६) ही गाडी अमरावती स्थानकावरुन सोमवार, शुक्रवार व शनिवारी सुटणार आहे.
सदर रेल्वे १९ जानेवारीपासून सुरत येथून सुटणार असून दि. २० जानेवारीपासून अमरावती येथून सुटणार आहे. या रेल्वेमुळे प्रवाश्यांची सोय होणार आहे. त्यासाठी सर्व नागरिकांनी मा. खा. डॉ. हीना गावित यांचे आभार मानले आहेत.