नंदूरबार l प्रतिनिधी
तळोदा, गावातील वाढत्या कुपोषणावर मात करण्यासाठी गावातील कारभारीचा सहभागा करिता नंदुरबार जिल्हा परिषद मार्फत सोमवारी येथील पंचायत समितीच्या सभागृहात कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती.या कार्यशाळेत सरपंचांनी कुपोषणास हद्दपार करण्याचा निर्धार केला आहे.दरम्यान सदर कार्यशाळेस महिला सरपंचांनी उपस्थिती लक्षणीय होती.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वाढते कुपोषण रोखण्यासाठी नंदुरबार जिल्हा परिषदेने ठोस पावले उचलले आहेत.त्यासाठी गाव पातळीवरिल सरपंच यांचाही सहभाग आवश्यक केला आहे.कुपोषणावर काय उपाय योजना करायचा यासाठी तळोदा तालुक्यातील ग्राम पंचायतींच्या सरपंचांनी कार्यशाळा सोमवारी येथील पंचायत समितीच्या सभागृहात कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती.कार्यशाळेचे उद्घाटन पंचायत समितीचे गट विकास अधिकारी पी पी कोकणी यांचा हस्ते करण्यात आले.
यावेळी विस्तार अधिकारी बी के पाटील,बी डी मोहिते उपस्थित होते.कार्यशाळेतील सरपंच याना मार्गदर्शन करताना गट विकास अधिकारी कोकणी यांनी सांगितले की,कुपोषणावर मात करण्यासाठी प्रशासन ठोस प्रयत्न करीत असले तरी यावर प्रबोधन करण्यासाठी गाव करभारीचाही तेवढाच सहभाग गरजेचा आहे.निदान समाजात याविषयी जनजागृती केली तर निश्चितच त्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.त्यामुळे आपण ठोस प्रयत्न करावे असे आवाहनही त्यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन बी के यांनी केले.सदर कार्यशाळेत जिल्हा समन्वयक संदीप घुसाल यांनी प्रशिक्षण दिले.
कार्यशाळेस सरपंच मोग्या भील,श्रीकांत पाडवी, शानूबाई वळवी,सविता गावित,अमरसिंह वळवी, पून्या वसावे,मंदा पाडवी, मधूकर ठाकरे, देवलाल ठाकरे,अजय ठाकरे,हिरालाल पाडवी, मोगीबाई पावरा,शैलेश ठाकरे,रमेश तडवी,दिलीप ठाकरे,एकवीरा पाडवी,अंजना मोरे,अनिता पवार,निशा चौधरी,दिलावर पाडवी,मीराबाई रहासे,दमयंती नाईक,यशोदा वळवी,लक्ष्मी पाडवी,वर्षा वळवी,प्रितीमा वळवी,सपना वसावे,अर्चना पाडवी,अनिता भीलाव,लक्ष्मी नाईक, वांतला पाडवी,सुनीता ठाकरे,प्रमिला पाडवी, प्रियंका पाडवी आदींसह ५५ सरपंच उपस्थित होते.