नंदुरबार l प्रतिनिधी
येथीलश्रीमती डी.आर. हायस्कूल मध्ये जिल्हा पोलीस मुख्यालय व युवा रंग फाउंडेशन च्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र पोलीस दलाचा 59 वा वर्धापन दिन शाळेचे मुख्याध्यापक व कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायण भदाणे,प्रमुख अतिथी पोलीस उपनिरीक्षक स्नेहदिप शिंदे,उपमुख्याध्यापक सुभाष चौधरी,पर्यवेक्षक विपुल दिवाण,पोलीस हवालदार सुनिल मोरे तसेच युवरांग फाउंडेशनचे संचालक जितेंद्र लुळे व राहुल शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायण भदाणे यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा नियम व कायदा सुव्यवस्था तसेच पोलिस दलाचे कर्तव्य व जबाबदाऱ्या यांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे औचित्य साधून युवा रंग फाउंडेशनचे संचालक व सहकाऱ्यांनी रस्तासुरक्षा नियमाविषयी पथनाट्यातून प्रबोधन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन हेमंत खैरनार तर आभार जगदीश बच्छाव यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक,शिक्षिका व शिक्षेकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.








