शहादा l प्रतिनिधी
येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित के.व्ही. पटेल कृषी महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन पिंपरी ता.शहादा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत दि.3 रोजी करण्यात आले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाच्या के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर दि.3 ते 7 जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.या शिबिराचे उद्घाटन पिंपरी येथील सरपंच युवराज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विकास पाटील, प्रगतिशील शेतकरी गणेशभाई पाटील, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रकाश पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटन कार्यक्रमाचा प्रारंभ सरस्वती पूजनाने झाला.उपस्थित प्रमुख अतिथींचे स्वागत करण्यात आले. शिबिर काळात प्रचार फेरी,शिवार फेरी, पथनाट्य, परिसर स्वच्छता आदि उपक्रम राबविण्यात येणार आहेत.यासोबत प्रगत कृषी तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
प्राचार्य डॉ.प्रकाश पटेल यांनी राष्ट्रीय सेवा योजना व विशेष श्रमसंस्कार शिबिराचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री. पाटील यांनी शिबीर काळात विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांविषयी माहिती देऊन सर्व ती मदत केली जाईल असे सांगितले. कार्यक्रम अधिकारी पंकज पेंढारकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन तेजस्विनी राजपूत व वैष्णवी धात्रक या विद्यार्थ्यिनींनी केले.आभार प्रदर्शन प्रा.संदीप पाटील यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना एककाचे स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.