Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पतंजली योग समितीतर्फे सहयोग प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ

team by team
January 6, 2023
in आरोग्य
0
पतंजली योग समितीतर्फे सहयोग प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ
नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुका पतंजली योग समितीतर्फे नववर्षा निमित्त सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ करण्यात आला आहे. या सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन   सेवानिवृत्त प्राचार्य बी. एस. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
शहरातील गिरीविहारवाडी सभागृहात दिनांक 5 जानेवारी रोजी सकाळी सहा वाजेला शिबिराचा शुभारंभ झाला.दीप प्रज्वलन प्रसंगी सेवानिवृत्त प्राचार्य बी. एस. पाटील,प्राचार्य डॉ. एन. डी. नांद्रे,प्राचार्य एन.डि. माळी,प्रशिक्षक वसंत पाटील,सौ. किरणताई राजपूत, अजयसिंग गिरासे उपस्थित होते.
सदर शिबिर 5 ते 30 जानेवारी पर्यंत दररोज सकाळी सहा ते सात या वेळेत होईल.या शिबिरात अनुभवी व तज्ञ योगशिक्षक मार्गदर्शन करणार आहेत.शिबिरात दररोज सूर्यनमस्कार, योगी जॉगिंग, दंड बैठका, सूक्ष्म व्यायाम, विविध व्याधींवर मात करण्यासाठी उपयुक्त अशी योगासने आणि प्राणायामचे शास्त्रशुद्ध पद्धतीने  निशुल्क प्रशिक्षण दिले जाईल.तसेच शिबिरात अष्टांग योग, षटकर्म, पंचप्राण, पंचकोष, ध्यान, योगनिद्रा, अध्यात्म आणि आयुर्वेद बाबत सखोल माहिती देण्यात येणार आहे.शिबिर यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर प्रत्येक सहभागी साधकास जिल्हा पतंजली योग समितीतर्फे प्रमाणपत्र मिळेल तसेच भविष्यात पतंजली योगपीठ हरिद्वारला योग शिबिरात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त नागरिकांनी फायदा घ्यावा व स्वतःचे आरोग्य सुदृढ ठेवून योग शिक्षकाच्या भूमिकेतून इतरांना मार्गदर्शन करण्याचे पवित्र कार्य करण्यासाठी सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन नंदुरबार तालुका पतंजली योग समितीतर्फे करण्यात आले आहे.
शिबिर यशस्वीतेसाठी जिल्हा प्रभारी एन. डी. माळी,भारत स्वाभिमानचे जिल्हा प्रभारी नवनीत शिंदे,जिल्हा संघटन प्रमुख वसंत पाटील,तालुका प्रभारी अजयसिंह गिरासे,विनोद सैंदाणे, प्रमोद मराठे,किशोर भावसार, भास्कर रामोळे,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख महादू हिरणवाळे,महिला प्रतिनिधी किरण राजपूत, निकिता ठक्कर, वृषाली पाटील आदिसह पतंजली योग समिती,भारत स्वाभिमान ,( न्यास)
महिला पतंजली योग समिती,युवा भारत, किसान सेवा संघ नंदुरबार जिल्हा .साधक परिश्रम घेत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

श्रीमती डी.आर.हायस्कूल मध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

Next Post

के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालयाचे पिंपरी येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन

Next Post
के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालयाचे पिंपरी येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन

के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालयाचे पिंपरी येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add