नंदुरबार l प्रतिनिधी
येथील डी.आर. हायस्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा राजश्री गायकवाड,प्रमुख पाहुण्या सविता पटेल,शाळेचे मुख्याध्यापक नारायण भदाणे,उपमुख्याध्यापक सुभाष चौधरी,उत्सव समिती प्रमुख राजेंद्र लांडगे हे मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्या सविता पटेल यांनी आपल्या मनोगतातून सावित्रीबाई फुलेंच्या जीवनातील प्रेरक प्रसंगाचे वर्णन करत आजच्या युगातील स्त्रियांचे स्थान व शिक्षणातून होणारी प्रगती या विषयी बहुमूल्य मार्गदर्शन करत त्यांची स्वरचित कविता सादर केली.
अध्यक्षीय भाषणात राजश्री गायकवाड यांनी स्त्रीयांच्या शिक्षणाचे महत्व विषद केले.
या प्रसंगी प्रणील सोनवणे या विद्यार्थ्याने सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा परिधान करून सर्वांचे मने जिंकली. यासाठी कलाशिक्षक देवेंद्र कुलकर्णी याने परिश्रम घेतले. यानिमित्ताने शाळेत निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.
निबंध स्पर्धेत अनुक्रमे प्रथम – मोहित नरभवर 9- ड, द्वितीय – गुरुदिप गवळी 8- ई, तृतीय उदय चौधरी 9 ड,उत्तेजनार्थ रिकी घमंडे 10 क,समर्थ मोरे 8 ई तसेच वक्तृत्व स्पर्धेत अनुक्रमे प्रथम – विराज वायकर 6 क, द्वितीय – रोशन छोटू पाटील 7 ब तृतीय विभागून – रोशन मोतीलाल पाटील 6 क,दर्शिल भामरे 6 ड तर उत्तेजनार्थ – आर्यन गावीत 6 ड, वेदांत पाटील 7 ड या सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षक बक्षीस व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण प्रशांत जानी व राजेंद्र लांडगे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली भदाणे,प्रास्ताविक कविता भंडारी,स्वागत सत्कार शितल भट तर ऋणनिर्देश कमल चौरे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व उत्सव समितीतील सदस्य,तसेच शिक्षक-शिक्षिकांचे मार्गदर्शन व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.