नंदूरबार l प्रतिनिधी
पत्नीने दारू पिण्यास पैसे न दिल्याचे आपल्या 4 महिन्याच्या मुलीचा गळा आवळून खून केल्याची घटना
लक्कडकोट ता. शहादा येथे घडली आहे.याप्रकरणी
म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहादा तालुक्यातील लक्कडकोट येथे राहणाऱ्या सोमनाथ सुकलाल पाडवी याने त्याची पत्नी भारती सोमनाथ पाडवी इच्याकडून दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पैसे देण्यास भारती पाडवी इने नकार दिला.याचा सोमनाथ ने मनात राग ठेवून भारतीस हाताबुक्यांनी मारहाण करून आई बहिणीवरून शिवीगाळ केली.तसेच झोपडीमध्ये झोपलेले लहान मुलगी रुचिता सोमनाथ पाडवी ( वय ४ महिने) हिस काढून तिचा हाताने गळा दाबून जमीनीवर आपटून देवून जिवे ठार मारले.
म्हणून भारती सोमनाथ पाडवी रा. लक्कडकोट ता. शहादा यांच्या फिर्यादीवरून म्हसावद पोलीस ठाण्यात सोमनाथ सुकलाल पाडवी याच्या विरुद्ध भादवी कलम ३०२,३२३,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पुढील तपास पोनि निवृत्ती पवार करीत आहेत.








