नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील भालेर येथील श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती निमित्त बालिका दिवस स्रीमुक्ती दिवस साजरा करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमात एक पात्री नाटिका,नाटिका , ओव्या भाषण व विविध वेशभूषा चे विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले कार्यक्रमासाठी अध्यक्ष स्थानी काकेश्वर विद्या प्रसारक संस्थेच्या संचालिका , माजी सरपंच सौ. बेबीबाई भास्करराव पाटील या उपस्थित होत्या. त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच संस्था अध्यक्ष भास्करराव पाटील व, माजी पोलीस निरीक्षक श्री.गणकवार यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

उपस्थित असलेल्या सर्व महिलांचा सन्मान व सत्कार करण्यात आला. शाळेच्या प्राचार्या सौ. विद्या चव्हाण पर्यवेक्षक श्री. कुवर सर्व शिक्षक, शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले सौ.सी.व्ही.पाटील यांनी सावित्रीबाईंच्या जीवनपटावर मनोगत व्यक्त केले. व्ही व्ही इशी यांनी आपले मनोगत व कार्यक्रमाचे सूत्र संचलन केले.सौ.सी.व्ही.पाटील यांनी आलेल्या मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरमने करण्यात आली.








