तळोदा l प्रतिनिधी
रंजनपुर येथे आदिवासी समाजाचे आराध्य दैवत गुलाम महाराजांच्या पत्नी संत दगू माता यांच्या पुण्यतिथीनिमित्त शांती दिवस साजरा करण्यात आला. यावेळी संत दगू माता यांच्या समाधीचे आ. राजेश पाडवी यांनी दर्शन घेऊन पूजन केले.
यावेळी संत गुलाम महाराज यांच्या आप परिवाराचे हजारो अनुयायी उपस्थित होते. तळोदा तालुक्यातील रंजनपुर(मोरवड) येथे आप परिवारातर्फे संत गुलाम महाराज यांच्या अर्धांगिनी संत दगुमाता यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी शांती दिवस साजरा करण्यात येतो. यावर्षी देखील हजारो भाविकांच्या उपस्थितीत शांती दिवस साजरा करण्यात आला. यावेळी आ.राजेश पाडवी यांनी आप गुलाम महाराज तसेच संत दगू माता व संत रामदास महाराज यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन पूजन केले.

यावेळी आप गुलाम महाराजांचे वंशज जितेंद्र पाडवी, प्रेम पाडवी ,परेश पाडवी विधानसभा क्षेत्र प्रभारी नारायण ठाकरे, रंजनपूरचे सरपंच अक्षता प्रविण वळवी, वासुदेव जितेंद्र पाडवी, माजी सरपंच प्रविण वळवी, ग्रा.पं .सदस्य संजय पाडवी, मालदाचे सरपंच गोपी पावरा, मोरवडचे पोलीस पाटील अशोक पाडवी तसेच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते. दरम्यान रंजनपुर येथील दगुमाता यांच्या पुण्यतिथीला अक्कलकुवा तालुक्यातील मोरांबा येथील आप गुलाम महाराज यांच्या अनुयायांनी संपूर्ण दिवस पायी दिंडीने चालत येऊन समाधी स्थळांचे दर्शन घेतले. शांती पूजन दिवस निमित्ताने रंजनपुर येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
रात्री भजन प्रवचन करण्यात आले.यावेळी आप चंद्रसेन महाराज यांनी आप गुलाम महाराज व रामदास महाराज यांच्या शाकाहार, व्यसनमुक्ती, वृक्षारोपण याविषयी शिकवण दिली.कार्यक्रमाला आमलाड, तळवे,मालदा, छोटा धनपूर येथिल सरपंच, ग्रा.पं. सदस्य तसेच ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.








