तळोदा l प्रतिनिधी
स्त्री शिक्षणाची ज्योत अखंड तेवत ठेवत स्त्री शिक्षणाची पाया भरणी करणा-या सावित्रीबाई फुले यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे अभिवादन करण्यात आले.
महिला शिक्षणाच्या पूरसकर्त्या,आद्य शिक्षिका,महात्मा जोतिबा यांचे अस्पृश्यता निवारण व समाजातील दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे सामाजिक कार्य त्यांनी निरंतर सुरू ठेवण्यासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती दिनी प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून तळोदा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय येथे अभिवादन करण्यात आले.
यावेळी उत्तर महाराष्ट्र विभागीय महिला अध्यक्षा सौ.अनिता संदीप परदेशीं,मा.बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय,शहराध्यक्ष योगेश मराठे,युवा नेतृत्व संदीप परदेशीं,शहादा तळोदा विधानसभा अध्यक्ष कुणाल पाडवी, कृ.उ.बा.स.मा.संचालक प्रल्हाद आप्पा फोके,अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष आरीफ शेख नुरा,सरचिटणीस महेंद्र पोटे,संघटक राहुल पाडवी,खजिनदार धर्मराज पवार,शहर उपाध्यक्ष गणेश पाडवी,नदीम बागवान,गणेश राणे,कार्यकर्ते नितीन मराठे मिस्त्री,इमरान शिकलिकर,गणेश मराठे, रवींद्र पाडवी उपस्थित होते.








