नवापूर l प्रतिनिधी
छञपती संभाजी महाराजांबाबद राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बेताल वक्तव्य केल्याचा आरोप नवापूर तालुका भाजपाकडुन करण्यात आला असून याचा निषेध करण्यात आला. नवापूर येथे भाजपचे तालुका अध्यक्ष भरत गावीत यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार यांच्या प्रतीकात्मक बॅनरला जोडे मारुन निषेध आंदोलन करण्यात आले.
भाजपचे तालुका अध्यक्ष भरत गावीत यांच्या संपर्क कार्यालया पासुन भाजपचे पदधिकारी यांनी हातात अजित पवार यांचे निषेध बॅनर हातात येऊन घोषना बाजी करत नवापूर शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर बॅनरला जोडे मारुन निषेध केला.भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशान्वये भाजपचे तालुका अध्यक्ष भरत गावीत यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले या प्रसंगी भाजपचे जिल्हासरचिटणीस राजेंद्र गावीत,तालुका सरचिटणीस जयंतीलाल अग्रवाल,
ओबीसीमोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हेमंत जाधव,तालुका उपाध्यक्ष जितेंद्र अहिरे,शहर उपाध्यक्ष सप्नील मिस्ञी,अजय गावीत,माजी नगरसेवक सुनिता वसावे,दुर्गा गावीत,सौरव भामरे,मनोज मावची,घनशाम परमार,कमलेश छञीवाला,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष दिनेश चौधरी,,हेमंत शर्मा,गोपी सैन,संदिप पाटील,वेलजी गावीत,जोहुर पठाण,जगदीश जयस्वाल,पवन दाडवेकर,लक्ष्मन चव्हाण,जिग्नेश पंचाल,प्रेम पवार,तोसिफ मनसुरी,अतुल ठिंगळे आदी भाजपचे पदधिकारी उपस्थित होते.या नंतर पोलिसांनी अजित पवार यांचे निषेध बॅनर ताब्यात घेतले.यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ,पो हे का निजाम पाडवी,विनोद पराडके,नरेंद्र नाईक यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.








