नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार-येथील काकासाहेब हिरालाल चौधरी महाविद्यालयात देवगिरी चित्रसाधना शॉर्ट फिल्म फेस्टीवल पोस्टरचे अनावरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना फिल्म फेस्टिवलबाबत माहिती देण्यात आली.
देवगिरी चित्रसाधना प्रस्तुत डॉ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालय आणि अजिंठा फिल्म सोसायटी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवलचे आयोजन दि.११ व १२ फेब्रुवारी २०२३ रोजी डॉ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आले आहे. यासाठी जिल्हास्तरावर सदर फिल्म फेस्टिवलचे पोस्टर अनावरण करण्यात येत आहे. या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा संयोजक जितेंद्र लुळे यांनी नंदुरबार येथील काकासाहेब हिरालाल चौधरी महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांना या फिल्म फेस्टिवलबाबत माहिती दिली.
तसेच प्रतिष्ठानचे सचिव रुपेश चौधरी, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.चंद्रकांत वाणी, प्रा.दिपक वरसाळे, प्रा.सोनल मोरे यांच्या हस्ते पोस्टर अनावरण करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे उपस्थित होते. सदर शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये नंदुरबार जिल्ह्यातून ज्यांना फिल्म पाठवायच्या असतील त्यांनी जितेंद्र लुळे (८३०८४९०१००) यांचेशी संपर्क साधावा, असे आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.








