म्हसावद l प्रतिनिधी
ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने पटणा (बिहार) येथे 12 ते 14 जानेवारी 2023 दरम्यान होणाऱ्या 18 व्या ज्युनिअर गट राष्ट्रीय आंतरजिल्हा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या मुले संघाची निवड चाचणी अजिंक्यपद साठी घेण्यात आली.
त्यात विद्या गौरव सेकंडरी इंग्लिश मिडीयम स्कुल आमलाड ता.तळोदा चा विद्यार्थी तुषार फ़ुलसिंग वसावे (ई.10 वी) हा उंचउडी या स्पर्धेत प्रथम आला त्याची निवड करण्यात आली.
त्याच्या या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा विद्यादेवी तांबोळी,सेवानिवृत्त सहाय्यक प्रकल्प अधिकारी अशोक तांबोळी, ललित पाठक, प्राचार्य विश्वास पवार,शिक्षक, शिक्षेकेतर कर्मचारी,विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले. त्याचे अभिनंदन शाळेत सुरु असलेल्या क्रिडा महोत्सवाचे उदघाटन प्रसंगी करण्यात आले.त्यास क्रीडा शिक्षक पुलायन जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.








