नंदूरबार l प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र दिंडोरी प्रणित गुरुवर्य परमपूज्य गुरुमाऊली यांच्या शुभ आशीर्वादाने व गुरुपुत्र नितीन भाऊसाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र नंदुरबार येथे 31 डिसेंबर या दिनाचे औचित्य साधून युवा प्रबोधन अंतर्गत व्यसनमुक्ती अभियान प्रचार प्रसाराची रॅली काढण्यात आली.
या रॅलीमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे बाल संस्काराचे व युवा प्रबोधन विभागाचे भाऊ व ताई सेवेकरी यांनी पर्यावरण पूरक अशा टोप्या परिधान करून त्यावर विविध प्रकारचे व्यसनमुक्तीचे संदेश,विविध प्रकारचे व्यसनांपासून होणारे मानवी जीवनाला तोटे, विविध कागदी फलक व फीत द्वारे त्यांनी प्रचार प्रसार केला तसेच श्री हुतात्मा शिरीष कुमार,शहीद स्मारक स्मृती,हुतात्मा चौक येथिल परिसराची स्वच्छता करून तेथे व्यसनमुक्ती अभियानाच्या संदर्भात घोषणा देऊन व्यसनमुक्ती व व्यसनांचे विविध प्रकार व त्यापासून होणारे विविध आजार व मनुष्यहानी या विषयी मार्गदर्शन करून व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेण्यात आली.
सदर व्यसनमुक्ती अभियानाची रॅली श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र – नेहरू पुतळा- नवीन नगरपालिका – जुनी नगरपालिका – शास्त्री मार्केट -शहीद शिरीष कुमार स्मारक,हुतात्मा चौक – गणपती मंदिर रोड – शनी मंदिर – हाटदरवाजा व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे संपन्न करण्यात आली.
तसेच नंदुरबार शहरातील 11 माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये जाऊन एकुण 2100 विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती अभियानाचा प्रचार प्रसाराची माहिती देऊन त्यांच्याकडून व्यसनमुक्तीची शपथ घेतली व संबंधित विद्यालयाचे मुख्याध्यापक व प्राचार्य यांना ग्रंथ भेट देऊन त्यांना साष्टांग दंडवत नमस्कार करण्यात आला.
व्यसनमुक्ती अभियानात यशस्वी करण्यासाठी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र केंद्राचे बालसंस्कार विभाग,युवा संस्कार विभागातील ताई व भाऊ सेवेकरी तसेच काका व मावशी सेवेकरी आदींनी नियोजन आयोजन व नियोजनाचा सेवा रुजू केली.








