Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

23 नवप्रविष्ठ पोलीस अंमलदार नंदुरबार जिल्हा पोलीस दलात रुजु

team by team
December 31, 2022
in क्राईम
0
23 नवप्रविष्ठ पोलीस अंमलदार नंदुरबार जिल्हा पोलीस दलात रुजु

नंदूरबार l प्रतिनिधी

 

सन 2019 यावर्षासाठी नोव्हेंबर , डिसेंबर- 2021 मध्ये नंदुरबार जिल्हा पोलीस दलामार्फत पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. मैदानी चाचणी, लेखी परिक्षा व वैद्यकीय तपासणीमध्ये उत्तीर्ण झालेले 14 पुरुष व 09 महिला उमेदवार असे एकुण 23 उमेदवार नंदुरबार जिल्हा पोलीस दलात नव्याने भरती झालेले आहेत.

 

नंदुरबार जिल्हा पोलीस दलात नव्याने भरती झालेले 14 पुरुष उमेदवारांना दि. 29 मार्च 2022 रोजी शारीरिक व कायद्याच्या प्रशिक्षण घेण्यासाठी पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर येथे तर महिला उमेदवारांना पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची, सांगली येथे पाठविण्यात आले होते. पोलीस प्रशिक्षण केंद्रात खडतर प्रशिक्षण पूर्ण करुन आलेले पोलीस अंमलदार दि. 29 डिसेंबर 2022 रोजी पुन्हा नंदुरबार जिल्हा पोलीस दलात हजर झाले आहेत.

 

 

पोलीस प्रशिक्षण केंद्रात खडतर प्रशिक्षण पूर्ण करुन आलेल्या पुरुष व महिला अंमलदारांची नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी भेट घेवून त्यांना आपले दैनंदिन कर्तव्य बजावित असतांना सर्व सामान्य जनतेचे लक्ष पोलीसांकडे असते, पोलीसाची प्रत्येक कृती ही समाजावर परिणामकारक असते त्यामुळे जनतेमध्ये काम करीत असतांना पोलीसांची वर्तवणूक नेहमी आदर्श व शिस्तप्रिय असावी. पोलीस दलात काम करीत असतांना नमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून आपले कर्तव्य पार पाडावे. तसेच दैनंदिन कर्तव्य पार पाडून स्वत:च्या आरोग्याकडे देखील तेवढेच लक्ष द्यावे.

 

 

नंदुरबार जिल्ह्याचा नावलौकिक वाढविण्यासाठी प्रत्येक पोलीस अंमलदाराने त्यादृष्टीने प्रयत्न करावे. प्रशिक्षण घेवून आलेल्या पोलीस अंमलदारांना पोलीस दलातील त्यांचे कर्तव्य व जबाबदारी याबाबत मार्गदर्शन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

 

 

यावेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, राखीव पोलीस निरीक्षक देवनाथसिंग राजपुत हे उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

अनिसतर्फे ‘द’ दारूचा नव्हे ‘द’ दुधाचा उपक्रम

Next Post

नंदूरबार येथे स्पर्श नर्सिंग होमच्या नूतन इमारतीचे उद्या उद्घाटन

Next Post
नंदूरबार येथे स्पर्श नर्सिंग होमच्या नूतन इमारतीचे उद्या उद्घाटन

नंदूरबार येथे स्पर्श नर्सिंग होमच्या नूतन इमारतीचे उद्या उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

April 13, 2026
माजी खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते नवजात बालकांसाठी ‘बालकवच’ किटचे वितरण

माजी खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते नवजात बालकांसाठी ‘बालकवच’ किटचे वितरण

April 13, 2026
नंदुरबारमध्ये हॉटेल मॅनेजरची निर्घृण हत्या; पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल

नंदुरबारमध्ये हॉटेल मॅनेजरची निर्घृण हत्या; पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल

April 13, 2026
नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add