नंदुरबार l
शहादा तालुक्यातील बिलाडी येथे चहा बनवून न दिल्याने पत्नीच्या हातावर कोयत्याने वार करुन दुखापत केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील बिलाडी येथील सुनिता मच्छिंद्र बागुल यांचे पती मच्छिंद्र शांताराम बागुल हे नेहमी दारुच्या नशेत राहतात. सुनिता बागुल या सकाळी ८ वाजता या गावातील बायकांसोबत चुनिलालभाई यांच्या शेतात मजूरीसाठी केल्या होत्या. मजूरी करुन दुपारी ३ वाजता घरी आल्या यावेळी पती मच्छिंद्र बागुल दारुच्या नशेत असतांना चहा बनवून दे असे सांगितले.
यावर सुनिता बागुल यांनी हातपाय धुवून दे नंतर चहा देते असे सांगितले. याचे वाईट वाटल्याने मच्छिंद्र बागुल याने कोयत्याने सुनिता बागुल यांच्या हाताच्या दंडावर वार करुन दुखापत केली. याबाबत सुनिता बागुल यांच्या फिर्यादीवरुन सारंगखेडा पोलिस ठाण्यात मच्छिंद्र बागुल याच्याविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








