नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील नांदर्खे, पिपरी, दुधाळे ग्रामस्थ व पवन ऊर्जा जमीन हक्क शेतकरी कामगार संघर्ष समितीतर्फे नवीन पवन ऊर्जा प्रकल्पास परवानगी न मिळण्याबाबत चे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना देण्यात आले. नंदूरबार तालुक्यातील नांदखें , पिंपरी , दुधाळे गावात आता पवन ऊर्जा कंपनी आपला प्रकल्प टाकणार आहे. परंतु या प्रकल्पाला गावकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे .
या निवेदनात म्हटले आहे की, या गाव शिवारात आदिवासी लोकांची जमीन नष्ट होत आहे . मुळात जमीन नष्ट होवून तेथे मोठमोठे टॉवर उभे राहणार आहेत . यामुळे शेती उत्पन्न संपवून जाईल. टॉवरसाठी घरे , रोड , विजेचे पोल , रस्ता अशा पद्धतीने बांधकाम केले जाते . यामुळे सुपिक जमीनीचा नाश होत आहे . तसेच पवनऊर्जा प्रकल्प आल्याने चोरीचे व गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे . त्यामुळे गावकऱ्यांना वेठीस धरले जाते . एवढेच नव्हेतर निसर्गाची हानी होवून झाडांची कत्तल केली जात आहे .
असा निसर्ग नष्ट होवून आमच्या गावाची भरभराटी नष्ट करण्याचा हा प्रयत्न होत आहे . प्रकल्पामुळे गुरांच्या पाण्याचा प्रश्नही भेडसावतो . वीजप्रवाह निर्माण झाल्यानंतर अनेकवेळेला शॉर्ट सर्कीट , विद्युत तारा तुटणे असे प्रकार घडल्याने परिसरात पिकाची हानी होते . या पवनऊर्जा प्रकल्पामुळे शेतकरी देशोधडीला लागत आहे . गरीब व भोळ्या शेतकऱ्यांना काही दलालांकडून त्या शेतकरीची जमीन विकत घेवून गरीब शेतकरी भूमीहीन होत आहेत . तरी या नांदखें पंचक्रोषित पवनऊर्जा प्रकल्पास प्रवेश देवू नये . जेणेकरून भविष्यात आमच्या गावाची नैसर्गिक हानी होणार नाही,व सुपिक जमीन नष्ट होणार नाही . गावकऱ्यांकडून सदर मागणीचे निवेदन पवन ऊर्जा जमीन हक्क कामगार संघर्ष समिती व ग्रामस्थांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना देण्यात आले.
यावेळी नारायण देसाई, अरुण वळवी ,जगन पाडवी, श्रीमंता पवार ,विजय पाडवी, वासुदेव भोये, जवाहरलाल राठोड ,भगवान चव्हाण, अशोक चव्हाण , पवन ऊर्जा जमीन हक्क कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष अरुण रामराजे , दामा पवार, भाऊराव पाडवी, हिरालाल चौधरी, शिवदास पवार, प्रवीण पवार, पिंट्या ठाकरे, भानुदास चौधरी, जगन पाडवी, राजू भोये, सुनील चव्हाण, शिवाजी चव्हाण तसेच शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.








