नंदुरबार l प्रतिनिधी
मराठा सेवा संघ संलग्नित राजश्री शाहू महाराज शिक्षण परिषदेच्या पश्चिम भारत राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी प्रा.डॉ.एन.डी.नांद्रे यांची मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार व राजश्री शाहू महाराज शिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ.नामदेव दळवी यांनी निवड केली.
प्रा.डॉ.एन.डी.नांद्रे हे सेवानिवृत्त प्राचार्य असून शिक्षण क्षेत्रात ते सध्या महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे अशासकीय सदस्य, नंदुरबार जिल्हा मराठी भाषा समितीचे सदस्य, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे नाशिक विभागाचे कार्यवाह तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी (टी.डी.एफ.) चे राज्य सहकार्यवाह आहेत. त्यांचे समिती, चळवळी, संघटना यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक समस्या, विद्यार्थी गुणवत्ता वाढ, शालेय स्तरावर मराठी भाषेचा निकाल उंचावण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन हे कार्य सुरु आहे.
तसेच नवीन शैक्षणिक धोरण-२०२० च्या अंमलबजावणीच्या बाबतीत राज्य स्तरावरील समितीमध्ये त्यांचा सहभाग आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० च्या अंमलबजावणीबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या अध्यक्षा खा.सुप्रियाताई सुळे, कार्याध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांच्या मार्गदर्शनाने चर्चासत्र, परिसंवादाचे आयोजन करुन शिक्षण संस्था तसेच शिक्षण क्षेत्रातील शिक्षक, प्राध्यापक, पालक यांच्या एन.ई.पी.-२०२० बाबत माहिती देत असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेवून मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.संजय पाटील यांनी शिफारस करुन पश्चिम भारतातील गुजरात, राजस्थान व दीव-दमण या तीन राज्यासाठी राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून निवड केली आहे.








