नंदुरबार l प्रतिनिधी
प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही येथील सुवार्ता अलायन्स चर्च्च तर्फे विविध उपक्रम राबविण्यात आले यावेळी खा. डॉ. हिना गावित आणि माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नाताळनिमित्त शुभेच्छा दिल्या.

ख्रिस्ती समाज नाताळ हा सन अध्यात्मिक रीतीने साजरा करतात नाताळ म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्मदिन येशू सर्व पाप,दारिद्र्यात असणारे सर्व जगातील लोकांना पापमुक्त करून त्यांना सार्वकालिक जीवन दिले. सर्वांनी एकमेकांवर प्रेम करावे असा संदेश दिला.
नंदुरबार मधील चर्चमध्ये डॉक्टर राजेश जिमा वळवी यांच्या अध्यक्षतेखाली नाताळ सण साजरा करण्यात आला.

नंदुरबारचे स्थानिक धर्मगुरू रेव्ह. अनुपकुमार वळवी यांनी ख्रिस्तांच्या जीवनावर प्रवचन दिले. यावेळी नंदुरबारचे स्थानिक धर्मगुरू रेव्ह. अनुपकुमार वळवी यांनी ख्रिस्तांच्या जीवनावर प्रवचन दिले. यावेळी धर्मगुरू रेव्ह जे.एच. पठारे, ग्लॅडविन जयकर,डि.एम.पाटील एल.पी.वळवी, सॅमसन जयकर, यांच्यासह नंदुरबार नगर पालिकेचे उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, माजी नगरसेवक विलास रघुवंशी, दीपक कटारिया, राकेश हासानी, चेतन वळवी, अतुल पाटील तसेच ख्रिस्त समाजाचे सर्व पंचमंडळी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते








