नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील दहिंदुले येथे विठ्ठल मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात 51 दात्यांनी रक्तदान केले. तसेच महिलांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.
दहिंदुले येथील माजी पंचायत समिती सदस्य तथा माजी उपसरपंच दीपक मराठे यांचा चिरंजीव कै. प्रज्वल याच्या स्मरणार्थ रक्तदान शिबीर आयोजित केले होते. शिबीर सकाळी 10 वाजेला सुरूवात करण्यात आली. यावेळी युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला यात महिलांनी रक्तदान केले.
कार्यक्रमाचे परिश्रम दीपक मराठे मित्र मंडळ व ग्रामस्थांनी घेतले. रक्त संकलन जनकल्याण ब्लड बँकेचे डॉ.अर्जुन लालचंदाणी, अशोक पवार, आकाश जैन, मनेश पवार, शेखर पाटील, सोनिया गावित, सूर्यवंशी यांनी केले. या रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.








