म्हसावद l प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व नंदुरबार जिल्हा किक बॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल येथे शालेय विभाग स्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी सौ.मनिषा खत्री यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपसंचालक सुनंदा पाटील, बोधिकर , मुकेश बारी विभागीय सचिव रामा हटकर नंदुरबार जिल्हा किक बॉक्सिंग असो.चे सचिव योगेश माळी अध्यक्ष गणेश मराठे,डॉ.मयूर ठाकरे ,संतोष मराठे क्रीडा शिक्षक आशिष कडोसे आदी उपस्थित होते. शालेय विभागीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी नंदुरबार,धुळे, जळगाव, मालेगाव नाशिक मनपा सह पाच जिल्याह्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला.
किक बॉक्सिंग स्पर्धेत जवळ पास 280 खेळाडूंनी सहभाग नोंदविला शालेय विभागीय स्पर्धेत पंच म्हणून किरण पाटील पिंपळनेर संभाजी अहिरराव ,अमोल सर तुषार सोपणार, मोहित सोनवणे प्रतीक खंडेलवाल अब्रार खान, मिर्झा खान, संदीप बाविस्कर यांनी स्पर्धेचे काम पार पाडले 14 वर्षा आतील 30 ते 35 किलो वजन गटात श्रद्धा वळवी प्रथम तर 17 वर्षा आतील 35 ते 40 मध्ये प्रिन्स गावित 41 ते 45 कीलोत उमेश पवार 52 ते 56 किलो वजनात हरिष चौधरी 61 ते 65 मध्ये प्रफुल पाटील व 75 किलो वजन गटात अक्षत परदेशी प्रथम सर्व्ह विजयी खेळाडूंची निवड बुलढाणा येथे होणाऱ्या राज्य स्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. स्पर्धेचे निरीक्षण जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी केले.सूत्रसंचालन व आभार विभागीय सचिव रामा हटकर यांनी मानले.








