नंदुरबार l
अक्कलकुवा तालुक्यातील जांगठी गावात विरोधात निवडणूक लढविल्याच्या कारणावरुन एकास मारहाण केल्याप्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा तालुक्यातील जांगठी येथील रायसिंग आरशी वळवी यांना आमच्या पार्टीविरोधात निवडणूक का लढविली. या कारणावरुन रायसिंग वळवी यांना मोत्या जेरमा वळवी, गणेश लसमा वळवी, वनसिंग खुमा वळवी, मोवाश्या नुरजी वळवी, पाश्या बहादऱ्या वळवी, साजन साऱ्या वळवी, दिलवरसिंग नुरजी वळवी व सुन्या मुंगा वळवी या आठ जणांनी हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली.
याबाबत रायसिंग वळवी यांच्या फिर्यादीवरुन मोलगी पोलिस ठाण्यात आठ जणांविरोधात भादंवि कलम १४३, २३२, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक युवराज रावताळे करीत आहेत.








