नवापूर l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील नवापूर पोलिस ठाण्याचा हद्दीतील पोलिस पाटील हे नागपूर येथे हिवाळी अधिवेक्षणावर विविध मागण्यासाठी मोर्चासाठी रवाना झालेत.सकाळी ११ वाजता तहसिल कार्यालयाचा आवारात सर्व पोलिस पाटील एस टी ने अधिवेक्षणाला रवाना झाले.
या अधिवेक्षणात पोलिस पाटीलाचे मानधन १५ ते १८ हजार पर्यत वाढ केली पाहीजे.पोलिस पाटल्याचे वय ६० वरुन ६५ पर्यत केली पाहीजे व नुतनीकरण कायम स्वरुपी बंद झाले पाहीजे.पोलिस पाटलांना सेवानिवृत झाल्यास ५ लाखा पर्यत सेवाभत्ता मिळाला पाहीजे.अशा विविध माण्यासाठी पोलिस पाटील नागपूर अधिवेक्षणाला रवाना झाले आहे.यात पोलिस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष अबेसिंग वसावे,पोलिस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष भिमा गावीत,उपाध्यक्ष विपिन गावीत,सचिव अविनाश वळवी,इलेश गावीत,भिवु कोकणी,किशोर वळवी,रमन पाडवी,स्नेहा वसावे,निर्मला गावीत,कुसुम गावीत,प्रियंका गावीत सह सर्व पोलिस पाटील रवाना झाले आहे.संपुर्ण पोलिस पाटलाचा राज्याचा मोर्चा हा दि २२ डिसेंबर २०२२ रोजी आहे.








