म्हसावद l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध निवेदक तथा सूत्रसंचालक, नवोपक्रमशील माध्यमिक शिक्षक विष्णू (दीपक) हरीदास जोंधळे यांना क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार सन 2022 जाहीर झाला असून दुसरे फुले आंबेडकर विचार राष्ट्रीय शिक्षक संमेलनात मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय शिक्षक अकादमीच्या वतीने दि.24 व 25 डिसेंबर रोजी राजर्षी शाहू महाराज नाट्य मंदिर धुळे येथे दोन दिवशीय फुले आंबेडकर विचार राष्ट्रीय शिक्षक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.या संमेलनात विष्णू जोंधळे यांना सपरिवार सन्मानित करण्यात येणार आहे.संमेलनाध्यक्ष तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा.डाॅ.श्रीपाल सबनीस,लोकसभेचे माजी अध्यक्ष सरदार चरणजितसिंग अटवाल, महाराष्ट्र राज्य मराठी भाषा समितीचे सदस्य प्रा.डाॅ.केशव देशमुख, डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखन साहित्य प्रसिद्ध समितीचे सचिव प्रा.डाॅ.प्रदीप आगलावे, माजी संमेलनाध्यक्ष प्रा.डाॅ.मिलींद बागुल यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.
श्री.जोंधळे हे सर्वोदय विद्या मंदिर प्रकाशा येथे माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.त्यांना यापूर्वी नंदुरबार जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार,मक्कनराव चॅरिटेबल ट्रस्टचा आदर्श शिक्षक पुरस्कार,बेटी बचाव फाऊंडेशनचा समाजसेवक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.त्यांना जाहीर करण्यात आलेल्या या पुरस्काराबद्दल माजी नगराध्यक्ष मोतीलाल फकिरा पाटील, सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील, पालिकेचे माजी गटप्रमुख प्रा.मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती अभिजित पाटील, माजी उपनगराध्यक्ष अरविंद कुवर, दीपक पटेल, माजी पंचायत समिती उपसभापती बापूजी जगदेव, माजी नगरसेवक के.डी.पाटील,लोटनराव धोबी,ज्ञानेश्वर चौधरी, डॉ.योगेश चौधरी, पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल,प्रा.नेत्रदीपक कुवर, हिरालाल रोकडे,रुपेश जाधव, प्राचार्य जयराज बि-हाडे आदिंनी अभिनंदन केले आहे.








