नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील १० ग्रामपंचायतींच्या निवडणूकामध्ये ८ ग्रामपंचायतीत यश मिळविल्याचा दावा आ. राजेश पाडवी यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात केला आहे.
शहादा तालुक्यातील १० ग्रामपंचायतींसाठी काल मतमोजणी झाली.या १० ग्रामपंचायतीसाठी लोकनियुक्त सरपंच पदासाठी ४५ तर सदस्य पदासाठी १६८ उमेदवार रिंगणात उभे होते.यात रविवारी १३ हजार ७५५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.तालुक्यातील म्हसावद येथे सर्वाधिक चुरस पाहायला मिळाली. तर बहिरपुर येथे रेखा खेडकर व खैरवे – भडगाव येथे भुरेसिंग सोनवणे हे उमेदवार अवघ्या एका मताने निवडून आले आहेत. तालुक्यातील पाडळदा, बिलाडी त ह., म्हसावद, खैरवे-भडगाव, कलमाडी त बो , निंभोरा, बहीरपूर, धांद्रे, या ८ ग्रामपंचायतीवर भाजपाने दावा केला आहे.
अदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, भाजपाचे जेष्ठ नेते दीपक पाटील यांच्या नेतृत्वावर जनतेने पुन्हा विश्वास दाखवला असून विकासापासून एकही गाव वंचित राहाणार नाही. जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही विकास प्रत्येक गावात व गावातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचवण्याचा मानस राहणार असून जनतेने एकहाती सत्ता दिल्याने गावाच्या विकासाला बाधा
येत नाही.त्यामुळे नवीन योजना पोहचविल्या जातील असे आ.राजेश पाडवी यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.








