नंदुरबार | प्रतिनिधी
भविष्यामध्ये आपण सर्वच येणार्या निवडणूकीला सामोरे जाणार आहोत. आपली विचारसरणी जरी वेगवेगळी असली, तरी सुध्दा बांधिलकी ही नंदनगरीशीच आहे. भविष्यात नंदनगरीचा सर्वांगीण विकासासाठी, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करुया असे प्रतिपादन नंदुरबारच्या नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी यांनी केले.त्या पालिकेच्या शेवटच्या सभेप्रसंगी बोलत होत्या.
नंदुरबार नगरपालिकेचा कार्यकाळ २४ ला समाप्त होत असुन २५ डिसेंबर पासुन पालिकेवर प्रशासक बसणार आहते.नंदुरबार पालिकेच्या प्रशासकिय इमारतीत लोकनेते माणिकरावजी गावित सभागृहात शेवटची सर्वसाधारण सभेचे आयोजन नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.यावेळी उपनराध्यक्ष कुणाल वसावे, मुख्यकार्यकारी अधिकारी अमोल बागुल आदी उपस्थीत होते.
यावेळी नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी म्हणाल्या की, आपण सर्वांनी गेली पाच वर्ष या शहराचा सर्वांगीण विकासामध्ये मला व माझ्या पदाधिकार्यांना सहकार्य केले. कोरोनाच्या भीषण संकटात सुध्दा नंदुरबार नगर परिषदेच्या सर्व पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, सर्व अधिकारी व कर्मचार्यांनी संकट काळात ज्या सेवा, सुविधा देऊन नंदनगरीच्या जनतेला जो धिर दिला तसेच नंदुरबार नगरपरिषदेची नवीन प्रशासकीय इमारत व्हावी, अशी नंदनगरीच्या जनतेची इच्छा होती आणि ते स्वप्न सुध्दा आपल्याच कार्यकाळात पूर्ण झाले, याचा सुध्दा मला अभिमान आहे.
महाराष्ट्रामध्ये अत्यंत दर्जेदार अश्या दोन-तीन नगरपालिका इमारती असतील त्यामध्ये निश्चितच नंदुरबार नगरपालिकेचे नाव जोडले गेले असुन नंदनगरीच्या सौदर्यांमध्ये नंदुरबार नगरपरिषदेच्या नूतन इमारतीमुळे भर पडलेली आहे. आपली नगरपालिका आपला अभिमान या वाक्याप्रमाणेच नगरपालिका नूतन इमारतीच्या उद्घाटनाचा सोहळा राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे तसेच इतर प्रमुख नेत्यांच्या हस्ते झाला ही आपल्यासाठी गौरवाची बाब आहे.भविष्यामध्ये आपण सर्वच येणार्या निवडणूकीला सामोरे जाणार आहोत. आपली विचारसरणी जरी वेगवेगळी असली, तरी सुध्दा बांधिलकी ही नंदनगरीशीच आहे. भविष्यात नंदनगरीचा सर्वांगीण विकासासाठी, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करुया, अशी अपेक्षा बाळगते.असे सांगत लवकरच २०२३ हे नूतन वर्ष सुरु होणार असुन, या नूतन वर्षातच आपल्या नंदुरबार नगरपालिकेच्या सुध्दा निवडणूका होणार आहेत आणि म्हणून तुम्हा सर्वांना नूतनवर्षाचा व येणार्या निवडणूकीच्या शुभेच्छा देत. नंदुरबार नगरपालिकेच्या शेवटच्या सर्वसाधारण सभेमधुन नंदनगरीच्या जनतेचेही नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी यांनी आभार मानत येणार्या काळात नंदनगरीचा जनतेच्या आशिर्वादाची शिदोरी आपल्या बरोबर असेल व आपल्या सर्वांच्या हातून नंदनगरीच्या जनतेची सेवा घडो हीच अशी अपेक्षा व्यक्त केली.
यानंतर विरोधी पक्षनेते चारदत्त कळवणकर यांनी पालिकेत प्रशासक बसला तरी सर्व जण मिळुन नागरीकांचे प्रश्न सोडवीण्यासाठी कटीबध्द राहण्याचे आवाहन केले.या सभेत सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी एकत्रीत मालमत्ताकर पाणीपटटी थकबाही सह भरणार्या मालमत्ता धारकांना चालू वर्षाच्या निव्वळ मालमत्ताकरावर १० टक्के सुट देण्याचा निर्णय घेण्यात आला.यासह महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियाना अंतर्गत पाणी पुरवठा विभागातील सुरु असलेल्या विविध कामासाठी मुदतवाढ मिळणे, स.नं. २७४, २७५ मधील समर्थ मंगलतीचे नगर मधील पाईप लाईन टाकणे कामी होणान्या अदमासे खर्चास मंजुरी देणे माळीवाडा परिसरातील जुना कोंडवाडा जागेत व्यापारी संकुल उभारणे,नंदुरबार नगर पालिका हद्दीतील वस्त्यांची जातीवाचक नांवे बदलुन नविन नांवे देणे.शेती विभागातील जागा रहिवास विभागात समाविष्ट करणे आदी १२ विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.








